शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: ...अन्यथा महाराष्ट्र तहानलेलाच राहिल, मनसेच्या 'या' नेत्यानं उचलला पाणीप्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 12:55 IST

देशात महागाईने जनता त्रस्त झाली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबरोबर एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

मुंबई - राज्यात आणि देशात सध्या भोंग्याचे राजकारण सुरू आहे. मनसेने सुरू केलेल्या या आंदोलनावर विविध पक्ष त्यांच्या सोईने प्रतिक्रिया देत आहेत. पण, याच भोंग्याच्या राजकारणात दुसऱ्या बाजूला सामान्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. तर, सर्वसामान्यांचे महत्त्वाचे प्रश्नही अडगळीत पडले आहेत. राज्यातील या भोंग्याच्या राजकारणामुळे अनेकांचं त्याकडे लक्ष गेले नाही. विशेष म्हणजे मनसेच्या नेत्यानेही या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. पुण्यातील मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विट करुन गंभीर प्रश्नावरुन महाराष्ट्राची गरज व्यक्त केली आहे. 

देशात महागाईने जनता त्रस्त झाली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबरोबर एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात एलपीजी गॅसच्या किमतीत 102.50 रुपयांनी वाढ झाली आहे. एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांच्या खिशावर प्रत्यक्ष परिणाम पडणार आहे. कोरोनाच्या लाटेनंतर सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले असताना या वाढत्या महागाई तोंड देताना सामान्यांची परवड होत आहे. तर, दुसरीकडे मे महिन्याचा उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. मराठवाडा, विदर्भात भोंग्यापेक्षा पाण्याचा प्रश्न लोकांना महत्त्वाचा वाटतो. 

मनसेचे नेते अनिल शिदोरे नेहमीच सामाजिक विषय घेऊन सोशल मीडियावर सक्रीय असतात. सध्या मनसेकडून राज्यात भोंगावाद, भोंगानाद सुरू असताना त्यांनी पाण्याच्या गंभीर समस्येकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. पाणी समस्येवर महाराष्ट्राने ठोस निर्णय घ्यायला हवा, अन्यथा महाराष्ट्र तहानलेलाच राहिल, असेही त्यांनी म्हटलंय.  ''अगदी उत्तम पाऊस झालेल्या वर्षातही मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात पाणीटंचाई जाणवणं ही काही चांगली गोष्ट नाही.. कल्पना करा, एखाद्या वर्षी पाऊसपाणी अगदी कमी झालं तर काय होईल?. महाराष्ट्रात पाणीवाटप नीट केलं नाही केलं तर भरपूर पाऊस पडूनही टंचाई रहाणार. उदाहरणार्थ, उस… लागवड ४ टक्क्यांहून कमी पण सिंचनासाठी असलेलं ७० टक्के पाणी त्यावर खर्च होतं. महाराष्ट्रानं ह्यावर ठोस निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र तहानलेला तो तहानलेलाच राहील.'', असे मत मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी व्यक्त केले आहे. 

दरम्यान, भोंग्यापेक्षा वाढती महागाई, पाणीसमस्या, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी हे महाराष्ट्रासमोर गंभीर प्रश्न आहेत. मात्र, सध्या राज्यासह देशात धार्मिक बाबींवर राजकारण केलं जात असून सर्वसामान्यांना ते आवडताना दिसत नाही. त्यामुळेच, सोशल मीडियातून युवा वर्ग मोठ्या प्रमाणात यावर व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणेMNSमनसेMosqueमशिद