शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Raj Thackeray: 'आपले-आपले पैसे कमवा अन् आपली-आपली दुकानं चालवा, असं चाललंय'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 11:27 AM

सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुनही राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. केंद्र आणि राज्य सरकारकडून आगामी काळातील सणांवर घालण्यात आलेल्या निर्बंधावरुन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देनुसतं त्या कोरोनाची दुसरी लाट येणार, तिसरी लाट येणार, अशी भीती दाखवली जाते. हे कुठपर्यंत चालणार? असा सवालही राज यांनी उपस्थित केला आहे.  

पुणे - राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणि रणनिती आखण्यासाठी राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज ते पुण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. यावेळी, कोविडच्या निर्बंधांवरुनही सरकारला लक्ष्य केलं.  

सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुनही राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. केंद्र आणि राज्य सरकारकडून आगामी काळातील सणांवर घालण्यात आलेल्या निर्बंधावरुन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. केंद्र सरकारनेही दहीहंडी आणि गणेशोत्सव सणांसाठी निर्बंध लागू केल्यासंदर्भात पत्रकाराने राज ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्यावर, मला वाटतंय की, या सगळ्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या हे लक्षात आलंय की, जे चाललंय ते बरं चाललंय. कारण, कुठं आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कुणी रस्त्यावर उतरायचं नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा आणि बरं चाललंय सरकाराचं, असे म्हणत राज ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारांवर गंभीर आरोप केले आहेत. नुसतं त्या कोरोनाची दुसरी लाट येणार, तिसरी लाट येणार, अशी भीती दाखवली जाते. हे कुठपर्यंत चालणार? असा सवालही राज यांनी उपस्थित केला आहे.  

निवडणुकांवरुनही सरकारवर टीकास्त्र

"राज्य सरकारलाच निवडणुका नको आहेत. निवडणूक घेण्याची सरकारचीच इच्छा नाही. याकडे आपण गांभीर्यानं पाहायला हवं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा घाट सुरू आहे", असं राज ठाकरे म्हणाले. 

ओबीसी जनगणना करा आणि निवडणुका घ्या

ओबीसी आरक्षण नसल्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयाला काहीच हरकत नाही. पण यामागे सरकारचं काही काळंबेरं असेल आणि आरक्षणाच्या मुद्द्याच्या आडून सरकार महापालिकांवर प्रशासक नेमून कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा विचार आपण करायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले. ओबीसींची जनगणना करुन निवडणूक घेण्यास काहीच हरकत नाही, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेElectionनिवडणूकCorona vaccineकोरोनाची लस