शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"राज ठाकरे दुटप्पी वागत आहेत..." 'त्या’ आरोपाबाबत अजित पवारांचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 14:54 IST

...चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर वरिष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’ घ्यावी...

बारामती (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीय राजकारण सुरु झाल्याचा राज ठाकरे यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्याला काही अर्थ नाही. ‘पवारसाहेबां’चे नाव घेतलं की ती बातमी होते. राज ठाकरे  ज्यावेळी ‘साहेबां’ची मुलाखत घेताना त्यांच्याबद्दल काय बोलत होते, ते सर्वांना माहिती आहे. तरीही ते दुटप्पी वागत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, पवार साहेबांना उभा महाराष्ट्र ५५ वर्षे ओळखतो. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यासमोर ठेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केले. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब असल्याचे अजित पवार म्हणाले.

कर्नाटक सरकारने जत तालुक्याला पाणी उपलब्ध करुन दिल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, आपण अनेकदा कर्नाटकमध्ये दूधगंगेच पाणी सोडलेलं आहे. आम्ही सरकारमध्ये असताना आपण एकमेकाला तशा प्रकारची मदत करत असतो. कधीकधी आपण सोलापूरला उजनीतून प्यायला पाणी सोडतो. एका बाजूला महाराष्ट्रीयन दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे. उजनीचं पाणी कर्नाटकवाले तिकडच्या बाजूने नदीची साईड येते, तिकडं उचलत असतात. आपल्या बाजूचे आपल्या बाजूने उचलत असतात त्याच्यात एवढं लगेचच काही त्याला वेगळं स्वरूप देण्याचा काही कारण नसल्याचे पवार म्हणाले.

समान नागरी कायद्याबाबत पवार म्हणाले, आत्ता केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. त्यांनी काही राज्यांमध्ये तशा प्रकारचा सुतोवाच केलेला आहे. स्वत: राजनाथ सिंग याबाबत बोलले. सुतवाच करणे वेगळं आणि अंमलबजावणी करणे वेगळं. कदाचित त्यांचा असा प्रयत्न असेल, अशा प्रकारचा आपण ‘स्टेटमेंट’ केल्यानंतर समाजातुन काय प्रतिक्रिया येते. बऱ्याचदा राज्यकर्ते एखादा निर्णय घ्यायचा असल्यास त्यावेळी एखाद्या स्टेटमेंट असं करतात,असे पवार म्हणाले.

महिलेला  मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे, या प्रश्नावर पवार म्हणाले, कुणाला काय वाटावं, तो त्यांचा त्याचा अधिकार आहे. उद्धवजींच्या मनामध्ये तसा आला असेल म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलेलं असेल. १४५ चा  बहुमत आकडा जो मिळवु शकतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो,असे पवार म्हणाले.

...चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर वरिष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’ घ्यावी- राज्यापालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानाचा सगळ्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलेला आहे. त्याबद्दल राज्यकर्ते लक्ष देताना दिसत नाही. तेवढ्यापुरते काहीतरी उत्तर देत वेळ मारून नेतात. वास्तविक या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची भावना अतिशय तीव्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहे. जनतेच्या दैवता बद्दल असं कोणी उठसूट वक्तव्य करणं, हे महाराष्ट्रातील जनता कदापि खपवून घेणार नाही. महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर संबंधित वरीष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’घ्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवार