राज ठाकरे ३ जानेवारीला रंगवणार शरद पवार यांची मुलाखत; पुण्यात 'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:09 PM2017-12-20T13:09:31+5:302017-12-20T13:14:32+5:30

'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा' या विशेष कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मुलाखत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रंगवणार आहेत. हा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता बृहन्महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स येथे होणार आहे.

Raj Thackeray interview to Sharad Pawar's on January 3; information from ramdas phutane in Pune | राज ठाकरे ३ जानेवारीला रंगवणार शरद पवार यांची मुलाखत; पुण्यात 'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा'

राज ठाकरे ३ जानेवारीला रंगवणार शरद पवार यांची मुलाखत; पुण्यात 'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा'

Next
ठळक मुद्दे१ जानेवारी रोजी नितीन गडकरी यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे संमेलनाचे होणार उद्घाटन२ जानेवारीला 'वाटा...चित्र-शिल्प काव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद३ जानेवारी : रवी जाधव यांच्याशी 'माझा चित्रपट प्रवास-नटरंग ते न्यूड व्हाया बालगंधर्व' संवाद

पुणे : 'शोध मराठी मनाचा' या जागतिक संमेलनामध्ये 'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा' या विशेष कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मुलाखत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रंगवणार आहेत. हा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता बृहन्महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स येथे होणार आहे.
तत्पूर्वी १ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी गडकरी यांची प्रकट मुलाखतही होणार आहे.
संमेलनात २ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता 'वाटा...चित्र-शिल्प काव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद रंगणार आहे. अंबरीश मिश्र मुलखात घेणार आहेत.
३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता दिगदर्शक रवी जाधव यांच्याशी 'माझा चित्रपट प्रवास-नटरंग ते न्यूड व्हाया बालगंधर्व' या विषयावर संवाद साधणार आहेत.
आॅस्ट्रेलिया येथील डॉ. विजय जोशी संमेलनाचे अध्यक्ष असून, स्वागताध्यक्षपदी बिव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड आहेत.
 

Web Title: Raj Thackeray interview to Sharad Pawar's on January 3; information from ramdas phutane in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.