शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात- राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 11:31 IST

महाराष्ट्रात जे काही घडलं तो जनतेचा अपमान आहे.

पुणे- महाराष्ट्रात जे काही घडलं तो जनतेचा अपमान आहे. अशा प्रकारची प्रतारणा भाजपाने केली, शिवसेनेने केली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे विचारायलाच नको, असं म्हणत मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 24 तारखेला पवारांची पावसातली सभा झाली आणि मग अनेक विशेषण लावण्यात आली.यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपाला कोपरखळी मारली आहे. निवडणुका झाल्यापासून काही बोललो नव्हतो. जे काही चालू होतं ते बघून माझीच नव्हे तर महाराष्ट्राची वाचा खुंटली होती. 23 तारखेच्या मनसेचा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी आहे. 23 जानेवारीला मनसेचे पहिले अधिवेशन मुंबईला पार पडणार आहे. तिथे जे काही बोलायचे ते मत मांडेनच, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. निवडणुकीसाठी पक्षांतर केलेले जनतेने पाडले. जनतेने अशांना जागा दाखवली आणि पुढे नशिबात असे काही असेल असे जनतेला वाटलेही नसेल. फार काही चालणार नाही, लोकांच्यात नाराजी आहे, असं म्हणत महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नसल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सूचित केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. इथली व्यवस्था कोसळली आहे. जे इथले मुस्लिम नागरिक आहेत त्यांना असुरक्षित वाटण्याचे कारण नाही. मात्र बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळमधून किती मुस्लिम आले हे तपासून बघायला हवे. त्यांच्या सोयी लावण्यासाठी देश नाही. माणुसकीचा ठेका फक्त भारताने घेतलेला नाही. भारत धर्मशाळा नाही. बांगलादेशातील नागरिकांना हाकलून दिलेच पाहिजे. असले कायदे आणून गोंधळ घालायची गरज नव्हती, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. बाहेरच्या देशातले लोक इथे आणण्याची गरज नाही. दरवेळी बॉम्बस्फोट झाल्यावर आपल्याला हे मुद्दे आठवतात. असे काही कडक पावले उचलावे लागतील अन्यथा हा हाताबाहेर गेलेला देश आहे. केंद्र सरकार, भाजप आणि इतर पक्षांनी राजकारण करू नये, असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार