शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर राज ठाकरे नतमस्तक; औरंगाबादला जाताना घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 18:20 IST

यावेळी राज ठाकरे म्हणाले, 'समाधीस्थळाच्या विकास आराखड्यासंदर्भात स्थानिकांशी चर्चा करणार...'

कोरेगाव भीमा (पुणे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.३०) रोजी श्री क्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या समाधीस्थळावर नतमस्तक झाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर ग्रामपंचायत, स्मृती समिती व धर्मवीर संभाजीराजे युवा मंच यांच्यावतीने सन्मान केल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकास आराखड्यासंदर्भात स्थानिकांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

मनसेचे राज ठाकरे हे पुण्याहून औरंगाबाद येथे निघाले होते. यावेळी त्यांनी श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झाल्यानंतर कवी कलश यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. समाधीस्थळी असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला.

राज ठाकरे या ठिकाणी येणार असल्याने सकाळपासूनच मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी समाधीस्थळावर अविनाश मरकळे यांनी राज ठाकरे यांना समाधीस्थळावरील नित्यपुजेची माहिती देत शिवप्रेरणा मंत्राचे पठण केले.

यावेळी राज ठाकरेंसोबत मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, सरचिटणीस किशोर शिंदे, उपाध्यक्ष बाळा शेडगे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रभारी निरिक हेमंत बत्ते, उपाध्यक्ष रामदास दरेकर, महेबूब सय्यद, वढू बुद्रुकच्या सरपंच सारीका शिवले, उपसरपंच हिरालाल तांबे, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे मिलींद एकबोटे, सोमनाथ भंडारे, अंकुश शिवले, माऊलीआप्पा भंडारे, अनिल भंडारे, कृष्णा आरगडे, राहुल कुंभार, माजी सदस्य सचिन भंडारे व मनसेचे अंकुश शिवले, राजेश शिवले, राजेंद्र शिवले, मंगेश शिवले व शंभूभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारRaj Thackerayराज ठाकरे