शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कोकण, मुंबईला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई, ठाण्यासह कोकणातील अनेक भागात मॉन्सूनचे बुधवारी जोरदार आगमन झाले असून, पावसाने कोकणासह मुंबईला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मुंबई, ठाण्यासह कोकणातील अनेक भागात मॉन्सूनचे बुधवारी जोरदार आगमन झाले असून, पावसाने कोकणासह मुंबईला झोडपून काढले आहे. सांताक्रूझमध्ये अतिवृष्टी झाली असून सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगडमध्ये गुरुवारी रेड अलर्ट दिला असून संपूर्ण कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचवेळी पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात १२ व १३ जून रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकणात मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.

बुधवारी सकाळपर्यंत बेलापूर, कणकवली, पनवेल, रत्नागिरी येथे ११०, श्रीवर्धन १००, अलिबाग, मुंबई ८०, भिवंडी, गुहागर, हर्णे, मार्मागोवा, मुरुड ७० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, ओझरखेडा ३०, मुक्ताईनगर २० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस झाला. विदर्भातील अकोला ७०, जिवंती ५०, अंजनगाव, चिखलदरा, चिखली, दारव्हा, मानोरा ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची नोंद झाली आहे.

घाट माथ्यावरील डुंगरवाडी ९०, ताम्हिणी, भिरा ८०, धारावी ७०, दावडी, कोयना (नवजा) ५०, कोयना (पोफळी) ४०, लोणावळा, शिरगाव ३० मिमी पाऊस झाला आहे.

सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबई व कोकणात मुसळधार पाऊस झाला. सांताक्रुझ २२१, मुंबई (कुलाबा) ४६, अलिबाग ३८, रत्नागिरी ५, डहाणू ४१, महाबळेश्वर २१, सातारा ३, अकोला १, अमरावती ३, नागपूर ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

यलो अलर्ट

रायगड जिल्ह्यात गुरुवारी रेड अलर्ट दिला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये १० ते १३ जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये १० ते १३ जून दरम्यान पावसाचा इशारा दिला आहे.

गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात १३ जून रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात ११ जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच १२ व १३ जून रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहरात हलक्या पावसाची शक्यता

पुणे शहर व परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळपर्यंत पुणे ३ व लोहगाव येथे २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी शहरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

...

मॉन्सूनचे विदर्भात आगमन

कोकण, मुंबईबरोबरच आज विदर्भात मॉन्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सूनने गुरुवारी तेलंगणाचा काही भाग, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील आणखी काही भाग, बंगालच्या उपसागरातील मध्य व उत्तर भागातील बहुतांश भागात प्रवेश केला आहे. बालसर, मालेगाव, नागपूर, भद्राचलम, तुरी अशी मॉन्सूनची सीमारेषा आहे.