धरणक्षेत्रत पावसाचा जोर ओसरला
By Admin | Updated: July 19, 2014 22:53 IST2014-07-19T22:53:03+5:302014-07-19T22:53:03+5:30
खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रत आज पावसाचा जोर ओसरला.

धरणक्षेत्रत पावसाचा जोर ओसरला
पुणो : खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रत आज पावसाचा जोर ओसरला. मात्र, गेल्या चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने पाणीसाठय़ातील वाढ सुरूच असून गेल्या 24 तासांत सुमारे सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे या प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांतील पाणीसाठा 4.35 टीएमसीवर पोहोचला आहे.
गेल्या चोवीस तासात हा पावसाचा जोर होता. शुक्रवारी सायंकाळी पाच ते शनिवारी सायंकाळी पाच या 24 तासांत या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रत सुमारे 144 मिलिमीटर पाऊस झाला. त्यात सर्वाधिक 87 मिलिमीटर पाऊस टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रत झाला. तर पानशेत आणि वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रत प्रत्येकी 27 मिलिमीटर व खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रत अवघा 3 मिलिमीटर पाऊस झाला. (प्रतिनिधी)
येडगाव : जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत भागाचे पाण्याचे भवितव्य अवलबूंन असलेल्या कुकडी प्रकल्पातील धरणो अद्यापही रिकामीच आहेत. रिमङिाम पावसाने प्रकल्पातील धरणांमधील पाणीसाठय़ात फारशी वाढ झाली नाही. ¨डंभे वगळता एकाही धरणाची टक्केवारी दोन आकडय़ांमध्ये नाही.
माणिकडोह, पिंपळगावजोगा, डिंभा आदी धरणो वगळता कुठल्याच धरणांमध्ये अद्याप पाणीसाठय़ात वाढ झाली नाही. वडज, येडगाव धरणांतून मात्र पाण्याची घटच दिसून येत आहे. माणिकडोह धरणात पावसामुळे नवीन 79 दशलक्ष घनफूट पाणी आले आहे. ¨पंपळगाव जोगे धरणात 21क् दशलक्ष घनफूट, ¨डंभा 625 दशलक्ष घनफूट पाणी आले आहे.
प्रकल्पात एकूण 2175 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, तो टक्के वारीमध्ये 7 टक्के इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला कुकडी प्रकल्पात 12,253 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तो टक्केवारीमध्ये 4क् टक्के इतका होता. धरणो भरण्यासाठी अद्यापही चांगल्या मोठय़ा पावसाची गरज आहे. (वार्ताहर)
4गेल्या आठवडयाभरात झालेल्या जोरदार पावसाने ता चारही धरणांमधील पाणीसाठा 4.35 टीएमसीवर पोहचला आहे. हे पाणी महापालिकेस पुढील चार महिने पुरेल एवढे आहे. 12 जुलै रोजी या चारही धरणांचा पाणीसाठा अवघा 1.10 टीएमसी होता. त्यामुळे पुणोकरांवरील पाणीकपातीचे संकट गडद झाले होते. मात्र, मागील आठवडयातील
पावसाने जवळपास सव्वा तीन टिएमसी पाणी वाढले असल्याने पुणोकरांना दिलासा मिळाला आहे.