पुण्यात पावसाने केला एक हजार मिमीचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 09:39 AM2019-09-25T09:39:37+5:302019-09-25T09:39:51+5:30

सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

Rainfall in Pune crosses a thousand mm stage | पुण्यात पावसाने केला एक हजार मिमीचा टप्पा पार

पुण्यात पावसाने केला एक हजार मिमीचा टप्पा पार

Next

पुणे : सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शहरात यंदा पावसाने १  हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. १ जूनपासून बुधवारी सकाळपर्यंत तब्बल १०१८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात पुणे शहरात ८७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुणे शहरात २४ ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. पार्किंगमध्ये व घरामध्ये पाणी शिरले होते. या पावसाबरोबर जोरदार वाऱ्यामुळे १३ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.

मंगळवारी पहाटे सव्वा ते दोन वाजेपर्यंतच्या एका तासात तब्बल ४६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी दिवसभर लख्ख उन्हे पडली होती. दिवसाचे तापमानही वाढले होते. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ८.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पुढच्या दोन तासात शहराच्या सर्वच भागात जोरदार पाऊस सुरु होता. 
रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ५४.३ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. पहाटे अडीचपर्यंत १९.२ मिमी आणि त्यानंतर सकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे रात्र असूनही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोडी झाल्याचे दिसून येत होते. भर पावसात पोलीस ही कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करीत होते.
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रापेक्षा पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात पावसाचा जोर अधिक होता. आज सकाळी आठ वाजेपर्यंत खडकवासला ७५, पानशेत ५९, वरसगाव ५७, टेमघर ५२, कासारसाई, कळमोडी  ७१, भाटघर ६८, पुरंदरमधील नाझरे धरणात ६२ मिमी पावसानी नोंद झाली होती. शहरात १३ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून झाडे पडण्यबरोबरच पाणी साचल्याने रस्ते ठप्प झाले होते. रात्रभर अग्निशामन दलाचे जवान हे झाडे दूर करण्याचे काम करीत होते. 

शहरात सर्वच ठिकाणाहून सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी घरात शिरले होते. त्यामुळे लोकांना हे पाणी बाहेर काढण्यात रात्र जागून काढावी लागली.कोंढवा येथील अंगराज ढाबा येथे रस्त्यावर इतके पाणी साचले होते की अनेक दुचाक्या, मोटारी पाण्याखाली गेल्या होत्या. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात गाड्या घातल्याने त्या बंद पडल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या.

Web Title: Rainfall in Pune crosses a thousand mm stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे