शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 20:57 IST

बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे तेलंगणा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडात पुढील दोन ते तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता आहे़.

पुणे : बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे तेलंगणा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडात पुढील दोन ते तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता आहे़.  १८ व १९ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ . बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्या असून ते पुढील २४ तासात पश्चिमेच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे़. गेल्या २४ तासात पडलेला पाऊस वैभववाडी, विक्रमगड १३०, सुधागड पाली ११०, माथेरान १००, भिवंडी, कल्याण ९०, ठाणे ८०, खालापूर, पनवेल ७, अंबरनाथ, उल्हासनगर ६०, पोलादपूर ५०, कणकवली ४० मिमी पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, ओझरखेडा ६०, लोणावळा, महाबळेश्वर ५०, शहादा ३० मिमी पावसाची नोंद झाली़ मराठवाड्यातील अर्धापूर, घनसावगी, हिमायतनगर, परभणी, शिरपूर १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात कोरची ५०, चिखलदरा, देवरी, सेलू ३०, आर्वी, कुरखेडा, मौदा, पारशिवनी २० मिमी पाऊस पडला़ घाटमाथ्यावर ताम्हिणी, लोणावळा ६०, डुंगरवाडी, कोयना (नवजा) ५० मिमी पाऊस झाला होता़.  

इशारा :

  •  १८ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. 
  • १९ सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़. 
  • २० सप्टेंबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता़. 
  • २१ सप्टेंब रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 
  • १८ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात घाट परिसरातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार
  • पालघर, रायगड, जिल्ह्यात मुसळधार तर, ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड जिल्'ात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. 
  • १९ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
  • रायगड, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, अहमदनगर, सातारा, परभणी, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ . 
  • २० सप्टेंबरला पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार, धुळे, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़. 
टॅग्स :weatherहवामानRainपाऊस