शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढील ४ दिवस पाऊस; काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बरसणार

By श्रीकिशन काळे | Updated: May 17, 2024 18:14 IST

तापमानात चढ-उतार होत असल्याने उकाडा आणि थंडी असं दोन्ही नागरिकांना अनुभवायला मिळत आहे

पुणे: राज्यामध्ये पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. कोकणात हवामान दमट राहील, असेही सांगण्यात आले आहे. शुकवारी (दि.१७) सायंकाळी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. 

अरबी समद्रामध्ये येमेनच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे. तसेच मध्य प्रदेश आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती पहायला मिळत आहे. परिणामी राज्यामध्येही पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. सध्या राज्यामध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यातच सकाळपासून मात्र उन्हाचा चटका जाणवत असून उकाडा कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गुरूवारी (दि.१६) काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. परंतु, कमाल तापमानात चढ-उतार होत असल्याने उकाडा आणि थंडी असा दोन्हीचा अनुभव नागरिकांना मिळत आहे. राज्यात कोकणात मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच शनिवारी (दि.१८) कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला. 

पुण्यात कसे राहील हवामान ?

पुणे व परिसराच्या भागामध्ये पुढील चार दिवस दिवसा उकाडा, सायंकाळी ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज दिला आहे. गेल्या २४ तासांमध्ये हडपसर २७.५ मिमी, तळेगाव १७.५ मिमी, मगरपट्टा ९.५ मिमी, चिंचवड ७.५ मिमी, वडगावशेरी ५ मिमी, शिवाजीनगर ३.५, कोरेगाव पार्क १.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसTemperatureतापमानenvironmentपर्यावरणthunderstormवादळHealthआरोग्य