शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पावसाची धुवांधार बॅटिंग; पाडव्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 17:15 IST

उपनगरात पावसाच्या सरींची जोरदार हजेरी...

पुणे : पुणे शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चांगलाच उकाडा जाणवत होता. तसेच हवामान विभागाने पावसाची शक्यता देखील वर्तवली होती. सोमवारी दुपारपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.  सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शहरातील बिबवेवाडी,कोथरुड,कर्वेनगर,सिंहगड रस्ता,वानवडी, वारजे माळवाडी या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळायला सुरुवात झाली. उद्या गुढी पाडव्याचा सण असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेले पुणेकरांची वरूणराजाच्या हजेरीने चांगलीच तारांबळ उडाली. 

पुणे शहरात पुढील ६ दिवस आकाश ढगाळ राहून सायंकाळनंतर मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तविली होती. शनिवारी दुपारी ४ नंतर शहराच्या अनेक भागात हलक्या पावसाने हजेरी लावली होती. मात्र,  लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर गर्दी नसल्याने लोकांची धावपळ झाली नाही. अनेकांनी या पावसाचा घरात बसूनच आनंद लुटला.

विदर्भ ते दक्षिण तामिळनाडूच्या अंतर्गत भागापर्यंत उत्तर -दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश व लगतचा भाग ते कॉमोरीन क्षेत्र व लगतच्या भागापर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक व केरळमार्गे पसरले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह दक्षिणेतील अनेक राज्यात अवकाळी पावसाचे संकट आले आहे. दक्षिण कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील ४ दिवस पावसाचे राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पुढील ४ दिवस पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मेघगर्जनेसह सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. .........

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानgudhi padwaगुढीपाडवा