शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात तब्बल आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार कमबॅक; ३ दिवस ढगाळ वातावरण राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 22:06 IST

पुढील ३ दिवस आकाश ढगाळ राहणार; १० जुलैपासून जिल्ह्यातील पावसात वाढ होण्याची शक्यता...

 पुणे : गेले काही दिवस नुसते आकाशात ढग दाटून येत होते. आता जोराचा पाऊस होणार असले वाटत असतानाच एखादी रस्ता ओला करुन जाणारी सर येऊन पाऊस गायब झाल्याचे दृश्य गेले आठवडाभर होते. तब्बल एक आठवड्यानंतर शहराच्या मध्य वस्तीत सोमवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे १० मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, लोहगाव येथे ०.५ मिमी पाऊस पडला.

गेल्या सोमवारी २८ जून रोजी शहरात १८.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आठवड्याभरात केवळ एकदाच भुरभुर पाऊस झाला होता. शहरात सकाळपासूनच उकाडा वाढला होता. त्यामुळे सायंकाळी पाऊस पडेल, असे वाटत असतानाच दुपारनंतर आकाश ढगांनी गर्दी केली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी येण्यास सुरुवात झाली. परंतु, हा पाऊस शहराच्या पश्चिम भागात तसेच शिवाजीनगर, गोखलेनगर, कॅम्प, कल्याणीनगर परिसरात पावसाचा जोर होता. लोहगाव परिसरात हलकी सर पडली. कात्रज परिसरात काही ठिकाणीच पावसाचा शिडकावा झाला. १ जूनपासून ५ जुलैपर्यंत शिवाजीनगर येथे १५२.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा ती ३३.८ मिमीने कमी आहे. त्याचवेळी लोहगाव येथे २१५.८ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा ९१.८ मिमीने अधिक आहे.

शहरात पुढील ३ दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून सायंकाळी हलक्या पावसाची सर येण्याची शक्यता आहे. १० जुलैपासून जिल्ह्यातील पावसात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान