पुणे : शहर व उपनगरातील काही भागात दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागात जोराच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने तारांबळ उडाली. सोमवारी पावसाचे सावट नसले तरी ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.विजांच्या कडकडात सुरू असल्याने तसेच ढगाळ वातावरणामुळे दुपारी अनेकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. सायंकाळनंतर ढगांची दाटी कमी झाली. सोमवारीही सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी झाल्याने पुणेकरांना काहीसे सुसह्य वाटले. रविवारी शहरात कमाल तापमान ३७ अंश नोंदविले गेले. त्यात सोमवारी एक अंशाने वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.>शहरात रविवारी दुपारनंतर अचानक ढग दाटून आले. त्यानंतर विजांचा कडकडाट सुरू होऊन काही उपनगरामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. धायरी, वडगाव बु. सहकारनगर, पद्मावती, पर्वती, वारजे, सिंहगड रस्ता यांसह अन्य काही भागात पाऊस पडला. सिंहगड रस्ता परिसरात काही काळ जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे या भागातील नागरिकांची तारांबळ उडाली. वाघोली परिसरात गाराही पडल्या
पुण्यासह उपनगरांमध्ये पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:59 IST