शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

रेल्वे स्थानकाचा ‘कारभार’ खासगी कंपनीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 13:21 IST

फलाट तिकीट देण्यासह रेल्वे स्थानकावरील स्वच्छता, पार्किंग सुविधा, कॅन्टीनसह सर्व कामे कंपनीकडे सोपविण्यात आली आहेत. 

ठळक मुद्देदेशातील महत्वाच्या ६८ रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्याचा निर्णय पुणे स्थानकातील विविध कामांसाठी भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या कंपनीची नियुक्ती रेल्वेच्या खासगीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू

पुणे : रेल्वे तिकीट व गाड्या सोडण्याचे दैनंदिन कामकाज वगळता पुणेरेल्वे स्थानकावरील बहुतेक कामे खासगी कंपनीकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फलाट तिकीट देण्यासह रेल्वे स्थानकावरील स्वच्छता, पार्किंग सुविधा, कॅन्टीनसह सर्व कामे कंपनीकडे सोपविण्यात आली आहेत. पुणे विभागीय रेल्वेच्या वतीने सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलींद देऊस्कर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील आदी उपस्थित होते. देशातील महत्वाच्या ६८ रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये पुणे स्थानकाचाही समावेश आहे. ही जबाबदारी इंडियन रेल्वे स्टेशन्स डेव्हलपमेंट कापोर्रेशनवर (आयआरएसडीसी) सोपवण्यात आली आहे. याअंतर्गत आयआरएसडीसीने पुणे स्थानकातील विविध कामांसाठी भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या कंपनीची नियुक्ती केली आहे. 

प्रामुख्याने रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. तसेच प्रवाशांना अधिक चांगल्याप्रकारे सुविधा पुरविण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. याअनुषंगाने आयआरएसडीसीने तीन वर्षांसाठी बीव्हीजी कंपनीची निवड केली आहे. सध्या स्वच्छतेपासूनची सर्व कामे रेल्वेकडून केली जातात. पण यापुढे पुणे रेल्वे स्थानक व परिसर, कॅन्टीन, पार्किंगची सुविधा, शुल्क आकारणी यांसह विविध कामे कंपनीवर सोपविण्यात आली आहेत. फलाट तिकीटही या कंपनीकडूनच वितरीत केली जातील. रेल्वे प्रशासनाकडे फलाट तिकीट वगळून सर्व तिकीटे देणे व रेल्वेच्या दैनंदिन संचलनाची जबाबदारी असेल. याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, खासगी कंपनीला ही कामे देण्यात आल्याने रेल्वेच्या खासगीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.------------ दृष्टीक्षेपात रेल्वे स्थानक -फलाक क्रमांक एकवर अधिक प्रकाशमान दिवे बसविणार-आठवडाभरात नवीन वातानुकूलित विश्रांती कक्ष- पाच सरकते जिने-महात्मा गांधी पुतळ्याजवळ शंभर फुट उंचीचा ध्वजस्तंभ उभारणार-फलाट ४ व ५ वर ग्रेनाईट बसविणार 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे