शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एक्सप्रेसच्या थांब्यासाठी भिगवणला 'रेलरोको आंदोलन'; बंगळुरू - दिल्ली ३० मिनिटे रोखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 13:48 IST

कळस ( पुणे ) : कोरोना काळापासून भिगवण रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला असून तो पूर्ववत करण्यासाठी ...

कळस (पुणे) : कोरोना काळापासून भिगवण रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला असून तो पूर्ववत करण्यासाठी मंगळवार (दि. २७) रोजी भिगवण आणि परिसरातील प्रवासी, नागरिकांच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बंगलोर- दिल्ली ३० मिनिटे रोखून थांबण्यात आली होती. स्टेशन प्रबंधक फारुख शेख यांनी मागणी वरीष्ठ विभागाला कळवून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

यापूर्वी थांबत असलेल्या हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एक्सप्रेस, सिद्धेश्वर, विजापूर या प्रमुख गाड्यांच्या थांबा सुरु करून हुतात्मा एक्सप्रेस, पुणे-लातूर (हरंगुळ), पुणे - अमरावती, उद्यान एक्सप्रेस या गाड्यांना देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी कर्मयोगी कारखाना संचालक पराग जाधव, भिगवणच्या सरपंच दीपिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, राजेगाव सरपंच माउली लोंढे, तानाजी वायसे, सचिन बोगावत, प्रदीप वाकसे, सुरेश बिबे, जावेद शेख, गोरख पोंदकुले, कपिल भाकरे, आदी सर्वपक्षीय नेतेमंडळी, प्रवासी, रिक्षा चालक, माथाडी कामगावर आसपासच्या गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

पुणे, नगर, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील भिगवण हे रेल्वे स्थानक मध्यवर्ती ठिकाण असून या स्थानकावर कोरोना लॉकडाउन पासून येथील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला. त्यामुळे भिगवण येथून शासकीय तसेच शैक्षणिक, औद्योगिक नोकरीसाठी कामानिमित्त पुणे, सोलापूर आदी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठा खोळंबा होत आहे. भिगवण हे पर्यटनासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. रेल्वे गाडयांना थांबा नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. 

एक्सप्रेस गाड्यांचा थांब्यासाठी रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले असून एक्सप्रेस गाड्यांचा थांबा पूर्ववत करण्यात न आल्यास यापेक्षा पुन्हा मोठे आंदोलन केले जाईल. 

- माऊली लोंढे (सरपंच राजेगाव) 

विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे थांबा पूर्ववत होण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनालाही वारंवार रेल्वे थांबा पूर्ववत सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला होता परंतु रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आंदोलनाची वेळ आली. यामुळे रेल्वे थांबा पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे. 

- दीपिका क्षीरसागर (सरपंच भिगवण)

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे