शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रेल्वेची ‘वेळ’ खराब, शेकडो गाड्यांना विलंब, रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:39 AM

दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणारी रेल्वे प्रवाशांना वेळेत सेवा देण्यात अपयशी ठरत आहे. मंगळवारी देशभरातील तब्बल ६७ टक्के रेल्वेगाड्या विलंबाने धावत होत्या, तर १४१ गाड्या रद्द करण्यात आल्या आणि १२५ गाड्यांच्या वेळेत विविध कारणांमुळे बदल करावा लागला.

- राजानंद मोरेपुणे : दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणारी रेल्वे प्रवाशांना वेळेत सेवा देण्यात अपयशी ठरत आहे. मंगळवारी देशभरातील तब्बल ६७ टक्के रेल्वेगाड्या विलंबाने धावत होत्या, तर १४१ गाड्या रद्द करण्यात आल्या आणि १२५ गाड्यांच्या वेळेत विविध कारणांमुळे बदल करावा लागला. त्यामध्ये लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस, विशेष अशा सर्वच गाड्यांचा समावेश असून यामध्ये पुणे विभागही अपवाद नाही.रेल्वेला दररोज लाखो प्रवाशांना सेवा देताना नाकीनऊ येऊ लागले आहे. देशभरात सुमारे १३ हजारांहून अधिक रेल्वेगाड्यांमार्फत प्रवासी वाहतूक केली जाते. त्यापैकी दररोज निम्म्याहून अधिक गाड्या कमी-अधिक वेळेच्या फरकाने विलंबाने धावतात. काही गाड्यांवर तर ‘लेट’चा शिक्काच पडलेला आहे. रेल्वेच्या वेळा सुधारण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यात रेल्वेला फारसे यश येताना दिसत नाही. ब्लॉक, अपघात, लोहमार्गाला तडे, लोहमार्ग उखडणे, सिग्नल यंत्रणेतील बिघाड, रेल्वेशी संबंधित कामे, नैसर्गिक आपत्ती अशा विविध कारणांमुळे रेल्वेगाड्या पूर्णपणे किंवा अंशत: रद्द केल्या जातात. तर अनेक गाड्या विलंबाने धावतात. त्यापैकी लोकल, पॅसेंजर गाड्यांना याचा अधिक फटका बसतो. तसेच विशेष किंवा साप्ताहिक गाड्यांनाही या प्रकाराला अनेकदा सामोरे जावे लागते.सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि रेलयात्री या संस्थांच्या ‘रेलरडार’ या संकेतस्थळानुसार मंगळवारी (दि. १५) दुपारी ३.३३ वाजता देशभरात विविध रेल्वेमार्गांवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी तब्बल ६७ टक्के गाड्या विलंबाने धावत होत्या. केवळ ३३ टक्के गाड्या वेळेत होत्या. ही स्थिती जवळपास दररोज पाहायला मिळते. तर रेल्वेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मंगळवारी देशातील १४१ गाड्या रद्द करण्यात आल्या असून, ७६ गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हे प्रमाणही अनेकदा दोनशे गाड्यांच्या जवळपास जाते.>मंडूवाडीह ते पुणे : तब्बल २६ तास २१ मिनिटे विलंबवाराणसी येथील मंडूवाडीह ते पुणे ही शनिवारी सुटणारी सुट्टी विशेष गाडी दरवेळी किमान २० ते २५ तास उशिराने धावते. ही गाडी दि. १२ मे रोजी सकाळी ४.४५ वाजता मंडूवाडीह या स्थानकातून निघणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात तब्बल २२ तास उशिराने पहाटे २.५० वाजता प्रस्थान केले. त्यानंतर विलंब होत जाऊन प्रत्यक्षात पुणे स्थानकात ही गाडी तिसºया दिवशी म्हणजे दि. १४ मे रोजी सकाळी ११.३६ वाजता पोहोचली. तब्बल २६ तास २१ मिनिटांनी उशिरा आली.पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाºया काही गाड्यांचा विचार केल्यास मागील काही दिवसांत गाड्यांना होणाºया सरासरी विलंबानुसार पुणे ते काझीपेठ ही गाडी १५ तास विलंबाने धावली. तर पुणे ते हातिया ही गाडी साडेपाच तास, पुणे ते बिलासपूर ही गाडी १ तास १३ मिनिटे विलंबाने धावत असल्याचे दिसते. पुण्यासह देशभरातील अन्य स्थानकांहून सुटणाºया गाड्याही सातत्याने विलंबाने धावत असल्याचे चित्र आहे.आम्ही मागील आठवड्यात मंडूवाडीह वाराणसी ते पुणे विशेष गाडीने प्रवास केला. अलाहाबाद ते पुणे हा रेल्वेप्रवास सुमारे २४ तासांचाच आहे. पण गाडी यायलाच तेवढा उशीर झाला. शेकडो प्रवासी कुटुंबासह गाडीची वाट पाहत या कडक उन्हाळ्यात ताटकळत उभे होते. त्यात लहान मुले, स्त्रिया व ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल झाले. गाडी उशिरा आली तरी पुढचा प्रवास तरी ती वेळेत पूर्ण करेल ही किमान अपेक्षा पूर्ण होत नाही. गाडी मधल्या अनेक लहान स्थानकांवर थांबवून ठेवण्यात येते. नियमित गाड्यांना पुढे सोडण्यात येते. उन्हाळी विशेष गाड्यांवर रेल्वेने असा अन्याय करणे योग्य नाही. त्यातही प्रवास करणारे माणसेच आहेत.- इंद्रसेन सिंह, प्रवासीपुण्यातून सुटणाºयागाड्यांना होणारा विलंबरेल्वेगाडी सरासरी विलंब१. पुणे-काझीपेठ १५ तास२. पुणे-बिलासपूर १ तास १३ मि.३. पुणे-दानापूर १ तास १० मि.४. पुणे-मनमाड ४५ मि.५. पुणे-हातिया ५ तास ३० मि.६. पुणे-हावडा १ तास७. पुणे-जबलपूर २ तास ५१ मि.८. पुणे-नांदेड ४७ मि.पूर्ण व अंशत: रद्द गाड्यादिवस रद्द गाड्या अंशत: रद्ददि. १२ मे १७५ ६२दि. १३ मे १८९ ५८दि. १४ मे १७३ ४८दि. १५ मे १४१ ७६(दुपारी ३ ची स्थिती)दि. १६ मे ९७ ३२(दुपारी ३ ची स्थिती)रेल्वेगाड्यांच्या वेळांबाबत प्रवाशांची सातत्याने नाराजी असते. काही गाड्या अचानक रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. रेल्वेगाड्या, स्थानकांवर पुरेशा सुविधा नसल्याने कुचंबणा होते. काही गाड्या २० ते २५ तास विलंबाने धावतात. याचा अनुभव अनेकदा घेतला आहे. या वेळी प्रवाशांचे होणारे हाल बघवत नाहीत.- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप१५ मे रोजीपुण्यातून रद्द गाड्या१. पुणे निझामाबाद पॅसेंजर२. पुणे-दौंड (स. १०.३२)३. पुणे-लोणावळा (दु. १२.१५)४. पुणे-लोणावळा (दु. १)५. पुणे-लोणावळा (दु. ३)प्रवासी हतबलकाही तास वेळ वायास्थानकांवर सुविधा नसल्याने हालखानपानाचा प्रश्नविश्रामगृहांची अपुरी सुविधाप्रवासादरम्यान मनस्तापअनेक कामांचा खोळंबादेशातील रेल्वे गाड्यांची स्थिती (दुपारी ३.३३ वा.)विलंबाने धावणाºया गाड्या- ६७ टक्केवेळेत धावणाºया गाड्या- ३३ टक्के