शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्या रद्द, एसटीला दुप्पट गर्दी, प्रवाशांची उडाली तारांबळ ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 16:39 IST

रुळावरून मालगाडी घसरल्याने डेक्कन क्वीन, प्रगती यांसह सकाळी पुण्यातून मुंबईकडे धावणाऱ्या सर्व एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या..

ठळक मुद्दे रेल्वेमार्ग उखडल्याने वाहतुक पुर्णपणे ठप्प

पुणे : कर्जत व लोणावळादरम्यान सोमवारी पहाटे रुळावरून मालगाडी घसरल्याने पुणे ते मुंबईदरम्यानची रेल्वेवाहतुक ठप्प झाली. त्यामुळे डेक्कन क्वीन, प्रगती यांसह सकाळी पुण्यातून मुंबईकडे धावणाऱ्या सर्व एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. परिणामी, पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची ससेहोलपट झाली. रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांनी एसटी बसकडे मोर्चा वळविला. पण अचानक दुप्पट गर्दी वाढल्याने एसटी प्रशासनाची तारांबळ उडाली. काही दिवसांपुर्वीच कर्जत ते लोणावळादरम्यान एक मालगाडी घसरल्याने रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. पुन्हा सोमवारी पहाटे ठाकुरवाडी घाट परिसरात मालगाडी घसरली. या घटनेमुळे रेल्वेमार्ग उखडल्याने वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली. मालगाडी बाजुला करणे आणि रेल्वेमार्ग दुरूस्त करण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने रेल्वे प्रशासनाने मुंबई ते पुणेदरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कन एक्सप्रेस या गाड्या रद्द कराव्या लागल्याने सकाळपासून रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. प्रामुख्याने सकाळी डेक्कन क्वीन व प्रगती एक्सप्रेसने मुंबईला जाणाऱ्या नियमित प्रवाशांची मोठी गर्दी असते. पण गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना एसटी बसचा पर्याय निवडावा लागला. पण नियमित प्रवाशांच्या तुलनेत दुप्पट गर्दी वाढल्याने पुणे एसटी बसस्थानकातील नियोजनही कोलमडू लागले. प्रवाशांची व्यवस्था करण्यासाठी शिवनेरी व शिवशाही बससह अन्य जादा गाड्याही मुंबईच्या दिशेने सोडाव्या लागल्या. -------------------सोमवारी रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या -- पुणे-मुबंई डेक्कन क्वीन- पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस- पुणे -मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस- पुणे - मुंबई डेक्कन एक्सप्रेस- पुणे-सोलापुर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस- मुंबई-पुणे डेक्कन क्वीन- मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस- मुंबई -पुणे इंद्रायणी एक्सप्रेस- मुंबई - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस- मुंबई - पुणे डेक्कन एक्सप्रेस- भुसावळ- पुणे एक्सप्रेस - पुणे-भुसावळ एक्सप्रेस- पुणे-पनवेल पॅसेंजर- पनवेल-पुणे पॅसेंजर- -----------सोमवारी अंशत: रद्द केलेल्या रेल्वेगाड्या- संत्रागाची-पुणे हमसफर एक्सप्रेस (पनवेल ते पुणेदरम्यान)- हुजुर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस (पुणे ते पनवेलदरम्यान)- पनवेल ते हजुर साहिब नांदेड एक्सप्रेस (पनवेल ते पुणेदरम्यान)- मुंबई - कोल्हापुर कोयना एक्सप्रेस (मुंबई ते पुणेदरम्यान)- कोल्हापुर ते मुंबई कोयना एक्सप्रेस (पुणे ते मुंबईदरम्यान)-------------------

 

टॅग्स :Karjatकर्जतRainपाऊसMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटMumbai Train Updateमुंबई ट्रेन अपडेट