शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Pune | लोणावळ्यात IPL मॅचवर बेटिंग घेणाऱ्यांवर छापा; पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 19:45 IST

पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) लोणावळ्यातील एका बंगल्यात ही कारवाई केली...

लोणावळा (पुणे) : आयपीएल मॅचवर सट्टा घेणाऱ्या पाचजणांवर लोणावळ्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून एक लॅपटाॅप, काही मोबाईल संच व टीव्ही असा साधारणत: एक लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) लोणावळ्यातील एका बंगल्यात ही कारवाई केली.

याप्रकरणी पुणे ग्रामीण एलसीबीचे सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून राजवीनसिंग मनजितसिंग बांगा (वय २७, क्लब व्यवसाय, रा. वडाळा ट्रक टर्मिनल, मुंबई), मस्कीनसिंग रजेद्रसिंग अरोरा (३०, क्लब व्यवसाय, रा. पंजाबी काॅलनी, सायन कोळीवाडा), शषांक महाराणा (रा. प्रतीक्षानगर सायन ईस्ट), इफ्तेकार ऊर्फ इमरान खान (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), षेन्टी (पूर्ण नाव माहीत नाही) रा. सायन ईस्ट कोळीवाडा यांच्यावर भादंवि कलम ४२०, ४६५ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ (अ), भारतीय टेलिग्राफ ॲक्ट कलम २५ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजस्थान राॅयल विरुद्ध लखनौ जाएंट या सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे सुरू असलेल्या आयपीएल सामन्यावर काहीजण एका खासगी बंगल्यात बसून बेटिंग घेत असल्याची गुप्त माहिती पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने तुंगार्ली भागातील या बंगल्याजवळ सापळा लावला. बुधवारी रात्री छापा मारला असता आत बंगल्यामध्ये वरील सर्वजण वेगवेगळ्या नावाने घेतलेल्या विविध मोबाईल सिमच्या माध्यमातून काही ॲप्लिकेशनचा वापर करत लॅपटाॅपवर बेटिंग घेत असताना मिळून आले. शासनाकडून बेटिंगवर बंदी असतानादेखील फसवणूक करत ही बेटिंग सुरू असल्याचे दिसून आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक व एलसीबी पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक चौधरी हे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :IPLआयपीएल २०२३Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड