इंदापूरात अवैध कत्तलखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:11 IST2020-12-06T04:11:17+5:302020-12-06T04:11:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बाभुळगाव : इंदापूरातील कुरेशीगल्ली येथे बेकायदेशारपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर इंदापूर पोलीसांनी शनिवारी धाड टाकली. ...

Raid on illegal slaughterhouse in Indapur | इंदापूरात अवैध कत्तलखान्यावर छापा

इंदापूरात अवैध कत्तलखान्यावर छापा

लोकमत न्यूज नेटवर्क

बाभुळगाव : इंदापूरातील कुरेशीगल्ली येथे बेकायदेशारपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर इंदापूर पोलीसांनी शनिवारी धाड टाकली. जनावरांचे मांस, कत्तलीसाठी आणलेल्या ७ जिवंत जर्सी गायी, तसेच ३० जर्सी गायींची नर जातीची लहाण वासरे, एक पिकअप, टॅम्पो, दोन मोटारी, एक दुचाकी आणि ७०० किलो मांस असा १० लाख ३० हजारांचा माल जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

आक्रम रशिद कुरेशी (वय १९), आलीम खय्युम कुरेशी (वय ३२) , तोफीक निस्सार मुलाणी (वय २८, सर्व रा.कुरेशीगल्ली,इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी फिर्याद पोलीस उपनिरिक्षक सिमा सुरेश मुंढे यांनी दीली आहे. फीर्यादीत म्हटले आहे. कुरेशी गल्लीत अवैध कत्तलखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या नुसार पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी जिवंत जनावरांसह ७०० किलो मांस जप्त केले. जीवंत जनावरांची सुटका करून तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालायाने त्यांना पोलिस कोठडी ठोठावली आहे. पुढील तपास सहाय्यक बोलीस निरिक्षक बीरोबा लातुरू हे करत आहेत.

Web Title: Raid on illegal slaughterhouse in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.