शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मंद उजेड ठेवुन स्त्री पुरुषांची अश्लील छायाचित्रे लावणाऱ्या कॅफे चालकावर छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 21:52 IST

कॅफेमध्ये केवळ बसण्यासाठी आकारले जात होते  ५० रुपये प्रतितास भाडे ?

ठळक मुद्देबारामती शहर पोलिसांची कारवाई

बारामती : मंद उजेड ठेवुन स्त्री पुरुषांची रंगविलेली अश्लील छायाचित्रे लावणाऱ्या कॅफेचालकावर बारामती शहर पोलीसांनी गुरुवारी(दि ५) सायंकाळी पाचच्या सुमारास  छापा टाकला. याप्रकरणी दोघा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कॅफेमध्ये केवळ बसण्यासाठी ५० रुपये प्रतितास भाडे आकारले जात असल्याचे भिंतीवर लिहिण्यात आले आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या गेट समोर असणाऱ्या दिगंबर प्लाझा या इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या हिडन कॉफी शॉपवर पोलिसांनी कारवाई केली आहे. महाविद्यालयात शहरातून तसेच आसपासच्या अनेक गावातून विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने शिकण्यासाठी येतात .मात्र मागील दोन महिन्यांपासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असणाऱ्या दिगंबर प्लाझा या इमारतीच्या तळमजल्यावर गाळा नं ११ मध्ये कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे चालत असल्याची पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुरवातीला पोलिसांनी पाहणी केली .यावेळी कॉफी शॉपमध्ये जाणीवपूर्वक मंद उजेड असणारे विद्युतदिवे लावल्याचे आढळले. या कॉफी शॉप मधील भिंतीवर स्त्री पुरुषांचे चुंबन घेतानाचे अश्लील पोस्टर चिटकवले आहेत. तसेच येथे मोठ्या आवाजात अश्लील गाणी लावली जात होती. येथील भिंतीवर एक तास बसल्यास ५० रुपये चार्ज पडेल, असे लिहिले आहे. या सगळ्या प्रकाराचा महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मानसिक त्रास होत असे. याबाबत पोलीस हवालदार विजय सोपान वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईमध्ये चालक राकेश उर्फ बिट्या गणेश गायकवाड याला अटक केली आहे. मालक तानाजी बाबुराव चौगुले फरार आहे. या दोघांवर विद्यार्थी विद्यार्थिनींना मानसिक त्रास देणे , अश्लील कृत्य करण्यासाठी प्रवृत्त करणे प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,पोलीस उपनिरीक्षक वाय. ऐ.शेलार, पो. कॉ. सिद्धेश पाटील, राजेश गायकवाड, योगेश कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. तसेच पुढील तपास संदिपान माळी करीत आहेत.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस