शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

लॉकडाऊनमध्ये तब्बल २५ - ३० पोपटांशी राधिकाची जमली गट्टी; पहाट होते सुमधूर आवाजाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 14:45 IST

कर्वेनगर परिसरात राधिका राहत असून, तिच्या खिडकीत आणि बाल्कनीमध्ये पोपट, बुलबुल, खारूताई, चिमणी येतात.

ठळक मुद्देपहाटे साडेसहा वाजता त्यांचे येणं सुरू होतं आणि साडेसात वाजेपर्यंत ते राहतातसर्व पाहून राधिकाचे आयुष्य आनंदाने गेले भरून

श्रीकिशन काळे

पुणे : लॉकडाऊनमध्ये ती घरीच असल्याने तिला बाल्कनी आणि खिडकीत पक्षी येत असल्याचे जाणवलं. वर्क फ्रॉम होम सुरू होते आणि घरातच २४ तास राहत असल्याने पक्ष्यांची ये-जा करण्याची वेळ तिला समजली आणि तिने मग त्यांना खाण्यासाठी धान्य ठेवलं. त्यांना तिचा एवढा लळा लागला की, आता ती त्या पोपटांना हाताने भरवते. राधिका सोनवणे असे तिचे नाव असून, तिची २५ ते ३० पोपटांशी चांगलीच गट्टी जमली आहे.कर्वेनगर परिसरात राधिका राहत असून, तिच्या खिडकीत आणि बाल्कनीमध्ये पोपट, बुलबुल, खारूताई, चिमणी येतात. राधिकाने एमबीए केले असून, सध्या म्युच्युअल फंड असिस्टंट मॅनेजर म्हणून ती कार्यरत आहे.

राधिका म्हणाली, ‘‘लॉकडाऊनपूर्वी देखील एक-दोन पोपट बाल्कनीत येत होते. पण त्यांच्याकडे फारसे लक्ष गेलं नाही. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये मात्र त्यांची संख्या वाढली. रोज पहाटे साडेसहा वाजता त्यांचे येणं सुरू होतं आणि साडेसात वाजेपर्यंत ते राहतात. त्यांचा हा दिनक्रम मी पाहिला. त्यानंतर मी सकाळी उठून त्यांना धान्य, फ्रूट, पाणी ठेवू लागले. त्यामुळे हळूहळू त्यांना माझी ओळख झाली. एकदा माझ्या हाताने त्यांना भरवलं तेव्हा तर माझ्यासाठी गगन ठेंगणं झाले. माझ्या बाल्कनीच्या समोर खूप झाडी आहे. त्यावर बसतात आणि माझ्या खिडकीत, बाल्कनीत येतात. सुरुवातीला दोन-तीन पोपट होते. पण नंतर त्यांची संख्या वाढली.’’

‘‘पोपटांना पाहून सर्व ताण निघून जातो. त्यामुळे मी सकाळी साडेसहा वाजता त्यांची वाट पाहत असते. एक-दोन पोपट तर माझे खूप खास बनले आहेत. ते माझ्याकडून खाऊन घेतात. मी त्यांचे निरीक्षण करते, तेव्हा अनेक गोष्टी समजल्या. त्यांचे डोळे, शेपूट, रंग यावरून मी त्यांना ओळखू लागले. घरातच पक्षीनिरीक्षणाचे धडे मला मिळाले. ’’

चिमणी पिल्लाला घेऊन बाल्कनीत भरवते...

पोपटांसोबत चार-पाच खारूताई देखील येऊ लागल्यात. एक चिमणी तर तिच्या पिल्लाला घेऊन बाल्कनीत आली होती. तिला मी ठेवलेले तांदूळ घेऊन ती भरवत होती. हा प्रसंग माझ्यासाठी आनंदाचा सर्वोच्च बिंदू होता. एक बुलबुल पण तिच्या पिल्लाला घेऊन आली होती. हे सर्व पाहून माझे आयुष्य खूप आनंदाने भरून गेले आहे. अनेक जण म्हणतात की, पक्ष्यांना खाऊ देऊ नये. पण मी त्यांना कोणतेही शिजवलेले अन्न देत नाही. त्यांना फक्त त्यांचेच खाद्य देते. जसे की धान्य, पेरू वगैरे. जे नैसर्गिक खाद्य आहे, तेवढेच त्यांना देत असते. कारण इतर काही दिले तर त्यांची तब्येत बिघडू शकते. असे राधिका म्हणाली.

टॅग्स :kothrudकोथरूडPuneपुणेbirds sanctuaryपक्षी अभयारण्यcorona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिकWomenमहिला