शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांची मोफत वाहतूकही रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 01:47 IST

नागरिक करू शकतील तक्रार; सी व्हिजिल अ‍ॅपचा वापरण्याचे आवाहन

पुणे : मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे, मद्य, मौल्यवान वस्तूंच्या वाटपाबरोबरच मतदार केंद्रापर्यंत मोफत वाहन व्यवस्था करणे देखील आचारसंहिता भंगाच्या कक्षेत येते. या आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने सी व्हिजिल अ‍ॅप तयार केले असून, स्मार्ट फोनच्या माध्यमातून एका क्लिकवर तक्रार करता येईल. या तक्रारींवर शंभर मिनिटांत कारवाई केली जाणार आहे.निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश सोमवारी (दि. ११) अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यावेळी उपस्थित होत्या. दरम्यान, जिल्हा माहिती कार्यालयाने आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी नागरिकांनाही तक्रार देता येऊ शकते, याची माहिती दिली.आदर्श आचारसंहिता भंग झालेल्या घटनेचे एक छायाचित्र अथवा दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागेल. ही माहिती भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जी.पी.एस.) स्वयंचलीत स्थान मॅपिंगसह अ‍ॅपवर अपलोड करावी लागेल. अ‍ॅप वापरकर्त्याला आपली ओळख लपवून देखील तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित तक्रार अवघ्या पाच मिनिटांतच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल.तक्रारीचा आढावा घेण्यासाठी एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ती माहिती पाठविण्यात येईल. त्या नुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या ‘जीव्हीआयजीआयएल अन्वेषक’ नामक जीआयएस-आधारित मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हीगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या १५ मिनिटाच्या आत पोहोचणे अपेक्षीत आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल....या कारणांसाठी करता येईल तक्रारमतदारांना पैसा, मद्य आणि अंमली पदार्थांचे वाटपशस्त्रसाठा अथवा शस्त्र वापरमतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या घटनाजमावाला चिथावणीखोर भाषण देणेपेड न्यूज आणि फेक न्यूजमतदारांना अमिष म्हणून वस्तूंचा वापरमतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूकउमेदवाराची मालमत्ता, अपात्रते संबंधीसी व्हिजिल अ‍ॅपबाबत...‘सी-व्हिजिल’चा उपयोग केवळ निवडणूक होत असलेल्या राज्यांच्या भौगोलिक सीमा अंतर्गतच करता येईलअ‍ॅप आधीच मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडिओंची अपलोड करण्याची परवानगी नसेलअ‍ॅपवरून क्लिक केलेले फोटो अथवा व्हिडिओ फोन गॅलरीमध्ये जतन होणार नाही‘सी-व्हिजिल’चा वापर केवळ आदर्श आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित खटले दाखल करण्यासाठी केला जाणार१८००१११९५० हा टोल फ्री क्रमांक अथवा राज्य संपर्क केंद्रावर १९५० या क्रमांकावर कॉल करता येईल

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९