शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन संघटनांमध्ये राडा; १३ जणांवर गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: November 2, 2023 17:27 IST

चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिलीस असून १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये सभासद नोंदणीवरून हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन संघटनांनी परस्पर विरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना बुधवारी (१ नोव्हेंबर) रोजी दुपारी बाराच्या सुमारास विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीन जवळ घडली.   याप्रकरणी सोमनाथ गोविंद निर्मळ (३२, रा. सांगवी) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव संगप्पा रंगा, आनंद सुखदेव फुसनर, हर्षवर्धन फरफुडे, अनिल ठोंबरे, अंकिता पवार, श्रेया संजय चंदन, सिद्धेरनागेश्वर लाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेचे अध्यक्ष आहेत. फिर्यादी हे त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत सभासद नोंदणी करत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महादेव संगप्पा रंगा आणि त्यांचे सहकारी हे लाठीकाठ्या सोबत घेऊन येथे काय करता असे म्हणून फिर्यादी यांना दमदाटी करत होते. यावेळी फिर्यादी यांनी सभासद नोंदणी करत असल्याचे सांगितले असता महादेव रंगा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टेबल उलटून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

 दरम्यान महादेव संगप्पा रंगा यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, त्यानुसार अक्षय गोविंद निर्मळ, अभिषेक मारुती शिंदे, गणेश बाळू जानकर, सोमनाथ गोविंद निर्मळ, अस्मिता धावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर सहमंत्री आहेत. फिर्यादी हे सहकाऱ्यांसोबत नाष्टा करण्यासाठी गेले असता सोमनाथ निर्मळ आणि त्याचे सहकारी पावत्या फाडत होते. यावेळी फिर्यादी यांनी विचारणा केली असता तुम्हाला काय करायचे, आमच्या कामात तुम्ही पडू शकत नाही नाही असे बोलून शिवीगाळ करून एकाने झेंड्याच्या काठीने कपाळावर मारून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या मैत्रिणीला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गाडेकर करत आहेत.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी