शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील रोटी घाटात रेसिंग बाइकचा अपघात, चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:34 IST

- परिवहन विभाग व महामार्ग पोलीसांच्या कारवाईची गरज

वासुंदे - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर असलेल्या दौंड तालुक्यातील रोटी घाटात आज सकाळी १०.३० च्या सुमारास रेसिंग बाइकचा अपघात होऊन चालक जखमी झाला. यावेळी सुदैवाने वाहतूक कमी असल्याने विपरीत घटना घडली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग नव्याने बांधण्यात आला असल्याने तो प्रशस्त व नयनरम्य दिसत आहे. त्यामुळे या मार्गावर बाजारात येणाऱ्या नवनविन चारचाकी गाड्यांचे चित्रीकरण करण्यासाठी तसेच बाइक रेसिंगसाठी शहरातून मोठ्या संख्येने तरुण येत असतात.या चारचाकी गाड्यांचे चित्रीकरण सुरू असताना त्या बेफाम वेगात या मार्गावरून पळवल्या जातात. तसेच बाइक रेसिंग करणारे तरुणांकडून अति वेगात गाड्या चालवल्या जातात. त्यामुळे इतर वाहन चालक व दुचाकीस्वारांना असल्या कसरती धोकादायक ठरत आहेत. आजच्या घटनेत बाइक रेसिंग करणारा युवक रोटी घाटातील तीव्र उताराच्या वळणावरून थेट दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये पडला. सुदैवाने या ठिकाणी विपरीत घटना घडली नाही. या मार्गावरून केल्या जाणाऱ्या बाइक रेसिंगवर व चारचाकी गाड्यांच्या धोकादायक चित्रीकरणावर परिवहन विभाग व महामार्ग पोलीसांनी वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. अन्यथा या मार्गावर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात