शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

बारामतीत नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावरुन नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 18:23 IST

भाजपचे सरकार असताना देखील दरवर्षी हे सानुग्रह अनुदान मिळाले आहे .मात्र आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत असून व पालिकेत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे.

बारामतीबारामती नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीमध्ये सानुग्रह अनुदान देण्यात येते . मागील वर्षी २० हजार रुपये अनुदान दिले होते. यंदा कोरोना संसर्गाच्या काळात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २५ हजार सानुग्रह अनुदान मिळण्याची मागणी केली आहे. त्याला नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी हिरवा कंदिल दाखविला. मंगळवारी (दि १०) पालिकेत याबाबत बैठक पार पडली. यावेळी मात्र सानुग्रह अनुदान देण्याच्या विषयावरुन घुमजाव करत या विषयावर मार्ग काढू अशी भूमिका घेण्यात आली. त्या विषयावरुन सत्ताधारी नगरसेवक यांच्यात जोरदार हमारीतुमरी झाल्याची चर्चा आहे.

नगर पालिकेत झालेल्या सानुग्रह अनुदानाच्या बैठकीत मोठ्या संख्येनेकर्मचारी अधिकारी उपस्थित होते.मागील वर्षी वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. ते यंदा पंचवीस हजार रुपये मिळावे या मागणीला नगराध्यक्षांनी होकार देखील दिला होता .मात्र काल संध्याकाळी पालिकेत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी ,नगरसेवक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आम्ही काहीतरी मार्ग काढतो असा सूर आळवला.त्यामुळे पालिकेचे कर्मचारी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहणार काय अशी भीती कर्मचाऱ्यांमध्ये आहे. पालिकेतील ३०० कर्मचाऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. मात्र याबाबत विचारकरू असे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांनी दिवाळी दोन दिवसांवर असल्याने सहाय्यक अनुदान जमा असून त्यातून सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तर पुढील महिन्यात पगार उशिरा द्यावा, अशी कर्मचाऱ्यांनी विनवणी केली. तर यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेच्या वतीने  पालिकेचा ठराव करुन पैसे देण्याची तयारी दाखवली.त्यानंतर  देखील हे पदाधिकारी बघू काही तरी मार्ग काढू ,असे आश्वासन देण्यात धन्यता मानत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी हवालदील झाले आहेत.

मागील काळात भाजपचे सरकार असताना देखील दरवर्षी हे सानुग्रह अनुदान मिळाले आहे .मात्र आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत असून व पालिकेत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे. यावेळी सफाई कर्मचारी ,पाणीपुरवठा ,उद्यानविभाग ,शिपाई यांनी कोरोना संसर्गाच्या काळात दिवस रात्र काम केले आहे. त्यांना तरी त्वरित सानुग्रह अनुदान देऊन त्यांची दिवाळी गोड करावी. बाकी कर्मचाऱ्यांना काही दिवसांनी द्या,अशी तयारी कर्मचाऱ्यांनी दर्शविली आहे.यावर देखील सत्ताधारी काही निर्णय देत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.स्थानिक  राजकारणात कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार का,असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.

दरम्यान, या बैठकीवेळी काही सत्ताधारी नगरसेवकांनी अप्रत्यक्ष विरोध केल्याने सानुग्रह अनुदान विषय लांबला.यावरुनच नगरसेवकांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाल्याचे समजले.तर याविषयावर कर्मचारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून उद्या भेटणार असून त्यांना निवेदन देणार असल्याचे समजले.——————————————पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोविड काळात जीवावर उदार होऊन रात्रंदिवस प्रामाणिक पणे काम केले आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे— नगरसेवक गणेश सोनवणे.————————————————————कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदानाची मागणी केली आहे .मात्र सध्या पालिकेचा नफा फंड अडचणीत असल्याने तसेच कोरोना संसर्गाच्या काळात पालिकेचे उत्पन्न कमी आहे.यावर काही तरतूद करून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार पौर्णिमा तावरे, नगराध्यक्ष——————————————————मी मुंबई येथे आहे .याबाबत काही बोलू शकत नाही.- किरणराज यादव; मुख्याधिकारी

————————————

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसEmployeeकर्मचारीDiwaliदिवाळी