शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

"आधी मास्क तोंडाला लाव आणि मग बोल..." अजित पवारांनी सरकारी कर्मचाऱ्याला भरला दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 14:26 IST

अजित पवार यांनी आतापर्यंत कोरोनाबाबतचे नियम पालन करणाऱ्या अशा अनेकांची थेट कानउघाडणी केल्याचे चित्र वेळोवेळी बघायला मिळाले आहे.

ठळक मुद्देअजित पवार यांच्या हस्ते फिरते माती, पाणी, पानदेठ परीक्षण प्रयोगशाळा चारचाकी वाहनाचे उद्घाटन

 पुणे: कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पूर्णपणे दक्षता घेताना आवर्जून पाहायला मिळतात.अगदी मंत्रालयातील बैठकीपासून ते अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसह कुठल्याही दौऱ्याच्या प्रत्येक ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचे ते अगदी कटाक्षाने पालन करतात. तसेच इतरांनाही ते करण्यास भाग पाडतात. यावरून आतापर्यंत त्यांनी अनेकांची थेट कानउघाडणी केल्याचे चित्र देखील वेळोवेळी बघायला मिळाले आहे. शुक्रवारी ( दि. ९ ) देखील पुण्यात एका सरकारी कर्मचाऱ्याला त्याचा अनुभव आला. 'आधी मास्क वर घे आणि नंतर बोल' अशा कडक शब्दात अजित पवारांनी या कर्मचाऱ्याचे चांगलेच कान टोचले. 

पुण्यात विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फिरते माती, पाणी, पानदेठ परीक्षण प्रयोगशाळा चारचाकी वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून पवार माहिती घेत असताना एका सरकारी कर्मचाऱ्याला त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचा प्रत्यय आला. 

कोरोनाच्या काळात अजित पवार अनेकदा या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे. कधी माध्यमांशी बोलण्यापूर्वी चॅनेलच्या बुमवर सॅनिटायझर फवारणे किंवा प्रतिनिधींना माईक दूर धरण्याची सूचना असो ते नेहमी दक्षता घेण्याच्या पावित्र्यात असतात. पवार फक्त प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी वा अधिकारी यांच्यासोबतच नव्हे तर इतर राजकीय नेते, मंत्री यांनी देखील कोरोनाबाबतच्या सर्व नियमांची काटेकोरपणे पालन करावे यासाठी नेहमीच आग्रही असतात. 

पुणेजिल्हा परिषदेच्या माध्यमातून फिरते माती, पाणी, पानदेठ परीक्षण प्रयोगशाळेच्या कामकाजाबाबत अजित पवार माहिती घेत होते. त्यावेळी इस्त्रायलमध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गेलेला एक कर्मचारी माहिती देत असताना अजित पवारांनी त्याला मध्येच थांबवत  आधी तोंडावरती मास्क घे आणि नंतर बोल असा सज्जड दम भरला. त्यानंतर उपस्थितांनी एकमेकांकडे बघत आपले मास्क वरती घेण्यास सुरुवात केली. 

अजित पवार घेतात काळजी मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यकर्ते बिनधास्त.. कोरोना कालावधीत उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वाधिक काळजी घेत आहेत. मास्क, हातमोजे सतत ते परिधान करतात. जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतात. स्वतःच्या बैठकीत काळजी घेतात. अधिकाऱ्यांना सूचना देतात. पवार हे नियम पाळत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांना विसर पडला आहे. कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचे निधन झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारzpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या