मास्कची कारवाई करणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST2021-04-03T04:10:15+5:302021-04-03T04:10:15+5:30

पुणे : मास्क परिधान न केलेल्या दोघांनी कारवाई करणाऱ्या पोलिसालाच धक्काबुक्की केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी दोघांविरोधात ...

Pushback to the police who acted on the mask | मास्कची कारवाई करणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की

मास्कची कारवाई करणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की

पुणे : मास्क परिधान न केलेल्या दोघांनी कारवाई करणाऱ्या पोलिसालाच धक्काबुक्की केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई गणेश काळे यांनी यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे कात्रज भागात गस्त घालत होते. त्यावेळी एका चहा विक्री करणाऱ्या टपरीवर दोघेजण मास्क परिधान न करता थांबले होते. काळे यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपींनी काळे यांना धक्काबुक्की केली. पावती करणार नाही, असे सांगून काळे यांना शिवीगाळ केली. काळे यांना धक्काबुक्की करून दोघेजण पसार झाले असून गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता यादव तपास करत आहेत.

Web Title: Pushback to the police who acted on the mask