शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

दूध खरेदीसाठी ३ नव्हे ५ रुपये प्रतिलिटर अनुदान द्या : राज्य दूध व्यावसायिक संघटना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 12:32 IST

गेल्या सहा महिन्यांपासून राज्य सरकारकडून दूध खरेदीसाठी दूध उत्पादकांना अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे

ठळक मुद्देशासनाच्या या अनुदान योजनेत राज्यातील बहुतेक सर्व दूध डेअ-या सहभागी

पुणे: राज्य शासनाने दूध अनुदानाची रक्कम कमी करून फेब्रुवारी महिन्यात प्रति लिटर केवळ ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दूध व्यापसायिकांना प्रति लिटर २ रुपये तोडा सहन करावा लागणार आहे. यामुळे शासनाने ३ रुपये ऐवजी ५ रुपये प्रति लिटर अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य दूध व्यावसायिक संघटनेच्या वतीने रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत केली. राज्य शासनाने दूध उत्पादनक शेतक-यांना हमी भावानुसार किमान २५ रुपये लिटर दूध देणे आवश्यक आहे. परंतु दूधाचे दर कमी झाल्याने शेतक-याकडून २५ रुपये दराने दूध खरेदी करण्यास दूध व्यावसायिकांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्य सरकारकडून दूध खरेदीसाठी दूध उत्पादकांना अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे. शासनाच्या या अनुदान योजनेत राज्यातील बहुतेक सर्व दूध डेअ-या सहभागी झाल्या आहेत. शेतक-यांच्या दूधाला २५ रुपये दर देताना दूध व्यावसायिकाला प्रतिलिटर २० रुपये द्यावे लागत आहे. यामुळे शासनाकडून ५ रुपये अनुदान देण्यात येत होते. परंतु आता फेब्रुवारी महिन्यांत शासनाने ५ रुपये ऐवजी ३ रुपयेच अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व दूध व्यावसायिक संघटनेची रविवारी पुण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाने नेहमी प्रमाणे ५ रुपये अनुदान देण्याची मगाणी करण्यात आली असल्याची माहिती राज्य दूध व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रmilkदूधGovernmentसरकार