कोविड सेंटरमध्ये पुरणपोळी अन शिरखुर्माची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:27+5:302021-05-15T04:10:27+5:30
शिरूर हवेली मतदार संघातील विविध भागात राव लक्ष्मी फाउंडेशन व पवार दाम्पत्याच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर्स उभारण्यात आली आहेत. ...

कोविड सेंटरमध्ये पुरणपोळी अन शिरखुर्माची मेजवानी
शिरूर हवेली मतदार संघातील विविध भागात राव लक्ष्मी फाउंडेशन व पवार दाम्पत्याच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर्स उभारण्यात आली आहेत. सुजाता पवार यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालून ही कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी योगदान दिलेले आहे. या सर्व कोविड केअर सेंटर्समध्ये रुग्णांना मिळणारी सेवा, सकस आहार हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला आहे. संभाजी महाराज जयंती,अक्षय तृतीया तसेच रमजान ईद हे पवित्र सण एकत्र आल्याने यानिमित्त शिरूर हवेली मतदार संघातील चां. ता. बोरा महाविद्यालय शिरूर, मांडवगण फराटा, उरळगाव, तळेगाव ढमढेरे, वाजेवाडी चौफुला, कोंढापूरी, शिरूर ग्रामीण रुग्णालय, न्हावरे ग्रामीण रुग्णालय, मलठण, पाबळ, कोरेगाव मूळ, लोणी काळभोर, वाघोली, कारेगाव येथील सर्व कोविड केअर सेंटरमधील रुग्णांचा सण गोड व्हावा या दृष्टिकोनातून या दाम्पत्याचा वतीने आज सकाळी सर्व कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना पुरणपोळीचे जेवण देण्यात आले.
पाबळ येथील कोविड सेंटरमध्ये जिल्हापरिषद सदस्या सविता बगाटे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र चौधरी, हृषीकेश कोल्हे, डी. के. घाटकर, राणी जाधव, किरण पिंगळे, रोहिणी चव्हाण, आगरकर, ललीता चौधरी यांच्या हस्ते येथील रुग्ण व आरोग्यसेवक यांना जेवण देण्यात आले.
--
फोटो क्रमांक : १४ शिक्रापूर कोविड सेंटरमध्ये जेवण वाटप.
फोटो फोटो..पाबळ ता .शिरूर येथील कोविड सेंटरमध्ये जेवण वाटप करताना. (धनंजय गावडे)