बारामतीच्या टंचाईग्रस्त गावांमध्ये पुरंदरचे पाणी

By Admin | Updated: August 18, 2014 23:16 IST2014-08-18T23:16:45+5:302014-08-18T23:16:45+5:30

तालुक्याच्या जिरायती भागासाठी पुरंधर उपसा सिंचन योजना संजीवनी ठरणारी आहे. मात्र, या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करणो गरजेचे आहे.

Purandar water in Baramati's scarcity-hit villages | बारामतीच्या टंचाईग्रस्त गावांमध्ये पुरंदरचे पाणी

बारामतीच्या टंचाईग्रस्त गावांमध्ये पुरंदरचे पाणी

बारामती : तालुक्याच्या जिरायती भागासाठी पुरंधर उपसा सिंचन योजना संजीवनी ठरणारी आहे. मात्र, या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करणो गरजेचे आहे. ठिबक सिंचन योजनेचे तंत्रज्ञान  ग्रामीण शेतक:यांनी अवलंबले पाहिजे. देशाच्या प्रत्येक भागातील बळीराजाने इस्त्रईल तंत्रज्ञानाचा वापर करणो ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी  केले.
आज  तालुक्याच्या 16 गावांसाठी वरदान ठरलेल्या पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या जलपूजन व लोकार्पण सोहळा तरडोली गावच्या अंतर्गत भोईटेवाडी (ता.  बारामती) येथे पार पडला.  पहिल्या टप्प्यात 7 गावांतील तलावांमध्ये पाणी सोडण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार,  प्रमुख पाहुणो जलसंपदामंत्री शशिकांत ¨शदे होते. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाऊसाहेब करे,  पंचायत समिती सभापती अमृता गारडे,  जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे, विजय कोलते, किरण गुजर, अशोक टेकवडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, खरेदी विकी संघाचे अध्यक्ष अंकुश रसाळ,  युवक अध्यक्ष विक्रम भोसले,  सुनिल भगत,  किरण तावरे, लालासो नलवडे,  अनिल सोरटे यासह जिरायती भागातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिरायती भागातील शेतक:यांच्या जीवनातील आजचा आनंदाचा दिवस उगवला आहे.  या भागातील सलग चार वर्ष पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारच्या तिजोरीतून या योजनेचे वीजबिल भरण्यात येणार आहे. पुरंधर उपसा योजनेचा हवेली, पुरंधर, दौंड, बारामती या तालुक्यातील गावांना फायदा होणार आहे. त्यासाठी दरमहा जवळपास 9क् हजार रुपये वीजबिल आकारणी होईल. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य शासन वीज बिलाचा भार सहन करणार आहे. परंतु, भविष्यात लाभक्षेत्रतील शेतक:यांनी नियमित पाणीपट्टी भरल्यास वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागेल. उजनी धरणाला 13क्क् कोटी रुपये खर्च झाले. त्यावर दरवर्षी 5 ते 6 कोटी रुपये शेती उत्पन्न घेणारे 3 जिल्ह्यातील शेतकरी आहेत. त्याच प्रमाणो या योजनेचा देखील वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी भविष्यात लोकसहभाग महत्त्वाचा ठरला आहे.  देशातील सांडपाण्याचा वापर करणारी व जमिनीपासून 1क्क्क् फुट उंच पाणी उचलणारी 6 टप्प्यातील शेती सिंचनाची ही पहिली योजना आहे. आता सध्या येणा:या पाण्याला वास येईल. परंतु, पुणो शहर व ¨पपरी चिंचवड महानगर पालिकेला या पाण्यावर पक्रिया करूनच ते नदीमध्ये सोडण्याचे सुचित केले आहे. यामुळे भविष्यात शेतीसाठी हे पाणी स्वच्छ मिळणार आहे.  आंबी ते बारामती दरम्यान क:हा नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. नदीवरील 19 बंधा:यातील  गाळ काढण्यात येत आहे. यावेळी जलसंपदामंत्री शशीकांत ¨शदे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शशांक मोहिते तर  नाना नेवसे यांनी केले. (प्रतिनिधी)
 
गुढय़ा उभारून केले पाण्याचे स्वागत..
लोकसभा निवडणुकीत अडचणीच्या ठरलेला 22 गावातील पाणी प्रश्न पुरंधर उपसाच्या माध्यमातून 6 ते 7 गावांचा आज सोडविण्यात आला आहे. योजनेचे पाणी तळ्यांमध्ये सोडले. पाणी प्रश्नावर या भागातील ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलने केली. उपोषण, मोर्चा, महिलांचा हंडामोर्चा, काळ्या गुढय़ा उभारणो अशी आंदोलने झाली. आज मात्र याच गावांमध्ये पाणी आल्याचे स्वागत गुढय़ा उभारून करण्यात आले. ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. 
 
दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य शासन वीज बिलाचा भार सहन करणार आहे. परंतु, भविष्यात लाभक्षेत्रतील शेतक:यांनी नियमित पाणीपट्टी भरल्यास वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागेल. उजनी धरणाला 13क्क् कोटी रुपये खर्च झाले. त्यावर दरवर्षी 5 ते 6 कोटी रुपये शेती उत्पन्न घेणारे 3 जिल्ह्यातील शेतकरी आहेत. 
-अजित पवार, उपमुख्यमंत्री
 
इस्त्रईल  हा देश फक्त पुणो जिल्ह्या एवढा आहे. पावसाचे दुर्भीक्ष्य येथे नेहमीच जाणवते. मात्र शेती उत्पन्नात जगात एक नंबरवर आहे.  अशा पद्धतीने तालुक्याच्या जिरायती भागातील शेतक:यांनी  शेती केली तर पाण्याची टंचाई जाणवणार नाही. उपलब्ध पाणी 4क् टक्के र्पयतच वापरता येणो शक्य आहे.  प्रत्येक गावातील शेतक:यांनी सामुहिक शेतीवर भर द्यावा. जमिनीच्या प्रतनुसार या भागातील शेतक:यांनी डाळींब व द्राक्ष यासारख्या फळबागांची लागवड केल्यास निश्चितच प्रत्येक भाग सुजलाम होईल. समाजाच्या मुख्य प्रवाहात सर्वाना आणण्यासाठी जातपात, धर्माचा विचार न करता सर्वसोयी देणो गरजेचे आहे.
-शरद पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री

 

Web Title: Purandar water in Baramati's scarcity-hit villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.