शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
5
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
6
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
7
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
8
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
9
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
10
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
13
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
14
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
15
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
16
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
17
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
18
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
19
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
20
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दमदाटी केल्यास पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध; शरद पवार यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 10:39 IST

शेतकऱ्यांचे समाधान आणि सहमती न घेता दमदाटी किंवा लाठीमार करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही

सासवड : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांचे समाधान आणि सहमती न घेता दमदाटी किंवा लाठीमार करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा खणखणीत इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला. खानवडी येथील महात्मा फुले स्मारकात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते, सुदामराव इंगळे, माणिकराव झेंडे, बबूसाहेब माहुरकर, दत्ता आबा चव्हाण, विमानतळ विरोधी कृती समितीचे दत्ता झुरंगे, संतोष हगवणे, जितेंद्र मेमाणे, सुनील धिवार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या हातात आहे; पण शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांना योग्य मोबदला आणि पॅकेज दिल्यास आमची हरकत नाही. मात्र, दांडगाईने मोजणी करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, तर सरकारला विरोध करण्याचा आम्हाला अधिकार आहे.’ त्यांनी शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करून विकास होत नसतो, असे सांगत सरकारने गावात येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, दहाजणांची समिती नेमून सर्वपक्षीय बैठक घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांनी अंतिम तोडगा काढावा, असा सल्ला दिला. ‘कायदा हातात घेऊन दंडुके उगारून सक्तीने निर्णय लादू नका,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वपक्षीय समिती नेमण्याची मागणी

खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून निर्णय घ्यावा, असे सांगत सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याची मागणी केली. ‘तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, आजी-माजी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल याची खात्री करावी,’ असे त्या म्हणाल्या. 

विमानतळ विरोधी समितीचा आक्षेप

विमानतळ विरोधी कृती समितीचे दत्ता झुरंगे, महादेव टिळेकर, संतोष हगवणे आणि जितेंद्र मेमाणे यांनी शेतकऱ्यांवर अन्याय आणि विस्थापन होत असेल, तर प्रकल्प नको, अशी भूमिका मांडली. ‘रिंग रोड आणि इतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जसा मोबदला मिळाला, तसाच मोबदला आम्हालाही मिळाला पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांना विश्वासात घ्या

विमानतळ प्रकल्पाबाबत सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे आणि सर्वपक्षीय समिती नेमून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

विमानतळ बाधित ग्रामस्थांची सभेकडे पाठ

सात गावातील विमानतळ बाधित ग्रामस्थांमध्ये दोन गट पडले असून, एक गट योग्य मोबदला दिल्यास जमिनी देण्यास तयार असून, त्यांनी बुधवारी खानवडी येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. यावेळी काही ग्रामस्थांनी मोबदला कशाप्रकारे मिळावा याचीदेखील मसुदा तयार करून शरद पवार यांना दिला, तर विमानतळ कोणत्याही परिस्थितीत नकोच या मागणीचा एक गट ठाम असून, त्यांनी पुण्यामध्ये ॲड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद घेतली. यास बहुसंख्येने सात गावातील सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Pawar warns government: No forceful land acquisition for Purandar Airport.

Web Summary : Sharad Pawar cautioned the government against forceful land acquisition for the Purandar airport without farmers' consent. He advocated for fair compensation and dialogue, supported by Supriya Sule's call for an all-party committee. Some villagers protest, demanding equivalent compensation to other project-affected farmers.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPurandarपुरंदरAirportविमानतळPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र