शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Purandar Airport : वगळलेल्या क्षेत्राच्या सातबारा उताऱ्यावरील शिक्के निघणार;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 18:28 IST

पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला सुमारे सात हजार एकर जमिनीचे संपादन करण्याचे ठरले होते. त्याला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला.

पुणे : प्रस्तावित पुरंदरविमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या क्षेत्रात कपात केल्यानंतर आता कपात झालेल्या क्षेत्राच्या सातबारा उताऱ्यावरील एमआयडीसीचे शिक्के काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना या जमिनींचे व्यवहार करता येणार आहे. मात्र, या जमिनी शेतकरी विमानतळासाठी देण्यास तयार असल्यास त्यांची जमीन घेतली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. दरम्यान, केवळ एका आठवड्यात विमानतळासाठी तबब्ल ५६ टक्के जमीन देण्याची संमती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली असून, संमती देण्यासाठी १८ सप्टेंबरनंतर मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला सुमारे सात हजार एकर जमिनीचे संपादन करण्याचे ठरले होते. त्याला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलनही केले. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्यानंतर भूसंपादन क्षेत्रात कपात करण्याचा निर्णय घेतला. सुमारे चार हजार एकर क्षेत्र कपात केल्यानंतर आता विमानतळासाठी तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून या सर्व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचे शिक्के मारण्यात आले होते. कोणत्याही भूसंपादन प्रक्रियेत संपादन मंडळाच्या नावाचे शिक्के मारले जातात. त्यामुळे संपादनास विरोध असला तरी या जमिनी सुरुवातीला संमतीने व त्यानंतर सक्तीने घेतल्या जातात. परिणामी, शिक्के पडल्यानंतर या जमिनींचे अन्य ठिकाणी व्यवहार करता येत नाहीत. त्यामुळेही शेतकऱ्यांमध्ये रोष पसरला होता.शिक्के काढणार

डुडी म्हणाले, ‘विमानतळासाठी सात हजार एकर जमीन घेतली जाईल, असा काही शेतकऱ्यांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात होता. केवळ तीन हजार एकर जमीनच संपादित केली जाईल. उर्वरित जमीन विमानतळासाठी घेतली जाणार नसल्याने या सातबारा उताऱ्यांवरील शिक्के काढण्यात येणार आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. मात्र, ही जमीन शेतकरी विमानतळासाठी देण्यात तयार असल्यास त्यांचीही घेतली जाईल.’१३१० शेतकऱ्यांची संमती

जमिनीला जादा भाव मिळावा आणि पुनर्वसन करावे, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुनर्वसनाची मागणीही मान्य केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध हळूहळू कमी झाला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या संपादित क्षेत्राच्या १० विकसित भूखंड देऊन जमीन परतावा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने २६ ऑगस्टपासून संमती घेण्यास सुरुवात केली आहे. संमती देण्याच्या पहिल्याच दिवशी १ हजारहून अधिक एकरच्या संपादनास ७६० शेतकऱ्यांची लेखी संमती दिली. आता त्यात आणखी वाढ झाली असून, सुट्यांचे दिवस वगळता केवळ पाच दिवसांत तब्बल १ हजार ५८० एकर जमिनीच्या संपादनाची संमती शेतकऱ्यांनी दिली आहे. यात शेतकऱ्यांची संख्या तब्बल १ हजार ३१० इतकी आहे. एकूण क्षेत्राचा विचार केल्यास तब्बल ५६ टक्के क्षेत्राची संमती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे.

जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संपादनाला विरोध करणारे काही जण एजंट आहेत. शेतकऱ्यांकडून कमी भावात जमीन घेऊन ते अन्यत्र विकण्याची शक्यता आहे. त्यांनी काही गुंतवणूकदारांकडून पैसे घेतल्याचे कळते. शेतकऱ्यांनी अशा एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नये. -  जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPurandarपुरंदरAirportविमानतळ