शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी मार्गातील घुसखोरांवर पीएमपीएमएल आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:13 IST

बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनचालकांवर पीएमपी व वाहतूक पोलिसांकडून सोमवारीही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन बीआरटी मार्गांवर ४७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

ठळक मुद्देमागील आठवड्यापासून सुरू करण्यात आली कारवाई शहरातील सर्व बीआरटी मार्गात चालू आहे फलक लावण्याचे काम

पुणे : बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनचालकांवर पुणे महानगरपरिवहन महामंडळ (पीएमपी) व वाहतूक पोलिसांकडून सोमवारीही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन बीआरटी मार्गांवर ४७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ‘बीआरटी’ मार्गावर अनेक खासगी वाहनचालक घुसखोरी करतात. त्यामुळे पीएमपी बसला अडथळा होण्याबरोबरच काही अपघातही झाले आहेत. यापार्श्वभूमीवर पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी बीआरटी मार्गावरील घुसखोर वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील आठवड्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. ‘पीएमपी’चा सुरक्षा विभाग व वाहतूक पोलिसांकडून सोमवारीही ही कारवाई करण्यात आली.नगर मार्गावर शास्त्रीनगर येथे २५ चारचाकी तर १० दुचाकी अशी ३५ वाहने तर वाकड येथील किवळे मार्गावरही ८ चारचाकी व ४ दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, सोमवारपासून वाहने जप्त केली जातील, असे मुंढे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, दोन्ही मार्गावर एकही वाहन जप्त करण्यात आले नाही. वाहनचालक घुसखोरी करत राहिल्यास मग वाहन जप्तीची कारवाई करावी लागेल, असे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.शहरातील सर्व बीआरटी मार्गात फलक लावण्याचे काम चालू आहे. बीआरटी मार्गात प्रवेश केल्यास वाहने जप्त करण्यात येऊन वाहनाचा लिलाव करण्यात येईल तसेच वाहनमालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे फलकांवर नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलtukaram mundheतुकाराम मुंढेPuneपुणे