शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

कर्तव्यात कसूर केल्याने पुण्यात डझनभर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर शिक्षेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 08:05 IST

विविध कारणावरुन पोलीस आयुक्त  डॉ़ व्यंकटेशम यांनी शहरातील १३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षकांवर शिक्षेची कारवाई केली आहे़. 

पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना लाच प्रकरणासारख्या गंभीर स्वरुपाच्या दखलपात्र गुन्हा दाखल करुन अखत्यारीतील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात व पर्यवेक्षण करण्यात अपयशी ठरणे, गंभीर घटनांचे गांभीर्य ओळखून तात्काळ दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे निर्देशन न देणे, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात अपयश, वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवर गुन्ह्याची प्रगतीची माहिती न देता उद्धटपणे संभाषण करणे, वैयक्तिक मानसिक त्रासातून कंट्रोल रुमवरील व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर आत्महत्या करीत असल्याचा संदेश पाठविणे अशा विविध कारणावरुन पोलीस आयुक्त  डॉ़ व्यंकटेशम यांनी शहरातील १३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षकांवर शिक्षेची कारवाई केली आहे़. 

त्यात एक ते दोन वर्षे वेतनवाढ रोखणे, सक्त ताकीद देणे, समज देणे अशा शिक्षांचा समावेश आहे़. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांवर कारवाई केल्याने संपूर्ण शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे़.  दखलपात्र गुन्हा असताना हेतू पुरस्पर दुर्लक्ष केल्याने उपनिरीक्षकाने तक्रार अर्ज प्रलंबित ठेवला़ त्यात साडेपाच लाख रुपयांचा स्वीकार पोलिसांनी केला़.  याचा तक्रार अर्जात उल्लेख असताना साक्षीदारांकडून प्राथमिक चौकशीत पुष्टी मिळाली आहे़, अशा प्रकरणात कमकुवत पर्यवेक्षण, बेजबाबदार व बेशिस्त वर्तनामुळे बातमी प्रसिद्ध होऊन पोलीस दलाची प्रतिमा मलीन होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल तत्कालीन एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची दोन वर्षे वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षेचा आदेश देण्यात आला आहे़. नुकताच तुरुंगात असतानाही कोर्टतारखेला आला असताना सराईत गुन्हेगाराने पत्नीच्या मदतीने कट रचून काही जणांवर हल्ला करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता़ सिंहगड रोड परिसरातील या गुन्ह्यातील आरोपी बंटी पवार याने यापूर्वी गेल्या वर्षी दोघांवर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले होते़. त्या प्रकरणात घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा आदेश देणे अपेक्षित होते़.  तसेच आरोपी हा जामिनावर सुटलेला आहे, हे माहिती असताना कारवाई केली नाही़.  त्यामुळे या घटनेचे पडसाद उमटून २० ते २५ जणांच्या टोळक्यांनी परिसरातील लोकांच्या मालमत्तेचे नुकसान केले़ दहशत निर्माण झाली़ त्यामुळे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची एक वर्षे वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली आहे़. 

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात अपयश आल्याने तसेच दर आठवड्याच्या टी आर एम बैठकीत वारंवार लेखी व तोंडी सांगितले असताना कारवाई करण्यात अपयश आल्याने एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा शिक्षा का देऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती़.  त्यांचा खुलासा समाधानकारक वाटल्यानंतर त्यांना सक्त ताकीद अशी शिक्षा देण्यात आली आहे.एकाच वरिष्ठ निरीक्षकाला एकाचवेळी दोन शिक्षावरिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्ह्याची प्रगतीची माहिती न देणे, तसेच फोनवर उद्धट संभाषण करणे याबद्दल समज तर, महत्वाचे सण, गुंडावर ठोस कारवाई न करणे,महत्वाच्या बैठकींना उपस्थित न राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचा अनादर करणे, अशा बेफिकिर वर्तनाबद्दल सक्त ताकीद अश दोन शिक्षा एका वरिष्ठ निरीक्षकाला एकाच वेळी सुनावण्यात आली आहे़. 

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेPolice Stationपोलीस ठाणे