शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

Corona Vaccination: पुण्याचं 'एक कोटी' लसीकरण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 21:39 IST

जिल्हा लसीकरणात अव्वल स्थानावर राहिला असून आजपर्यंत एक कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे.

ठळक मुद्देलसीकरणाचा हाच वेग लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचं लसीकरण होणार

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यासहित पुण्यातही हाहाकार माजवला होता. या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यावेळी आरोग्य यंत्रणाही हतबल होण्याच्या मार्गावर होती. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करून दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी धडपड करत होते. दोन महिन्यांनी दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली. त्याच पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच त्यांनी लसीकरणावरही भर दिला आहे. 

पुणे जिल्ह्यातही रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला होता. त्याच वेळी खबरदारी घेऊन लसीकरणाचा वेग वाढवला. त्यानंतर जिल्हा लसीकरणात अव्वल स्थानावर राहिला असून आजपर्यंत एक कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. ७० लाख नागरिकांनी पहिला तर ३० लाख नागरिकानी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचा हाच वेग राहिला तर लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचं लसीकरण होईल. लसींचा मुबलक पुरवठा सामाजिक संस्था, कंपन्यांकडून संयुक्‍तपणे राबविण्यात येणारी लसीकरण शिबिरे यामुळं पुण्यानं लसीकरणाचा उच्चांक गाठला आहे. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात ११ लाख जणांचं लसीकरण झालं होतं.  

जानेवारी मध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्यात डॉक्‍टर आणि नर्स यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स आणि टप्याटप्याने ६० वर्षांपुढील, ४५ वर्षांपुढील तर आता १८ वर्षांपुढील अशा सर्वांचे लसीकरण सुरू आहे. जानेवारी ते मार्च या महिन्यांत ८ लाख ८४ हजार लभार्थ्यांचे लसीकरण झाले. मे महिन्यात ५ लाख ४३ हजार लसीकरण झाले. लाभार्थ्यांची वाढती संख्या आणि लसीचा अपुरा पुरवठा यामुळे लसीकरण कमी होत होते. मात्र, जूननंतर लसीकरणाचा वेग वाढल्यामुळे मागील साडेतीन महिन्यांत तब्बल ६३ लाख लाभर्थींचे लसीकरण झाले. म्हणजे एकूण लसीकरणामधील ७० टक्‍के लसीकरण या साडेतीन महिन्यांत झाले. 

१५ दिवसांत ५ वेळा तब्बल १ लाखांपेक्षा अधिक लसीकरण 

सप्टेंबरमध्ये लसीचा मोठ्या प्रमाणात आलेला साठा आणि विविध कंपन्यांकडून राबविण्यात आलेल्या लसीकरणामुळे मागील पंधरा दिवसांत तब्बल 5 वेळा जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक लसीकरण झाले. तर, एका दिवशी तब्बल पावणेतीन लाख लसीकरणाचा टप्पा पार करत उच्चांक गाठलेला आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका