शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांचा प्रवास हाेणार प्रदूषणमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 12:04 IST

पुणेकरांचा प्रवास आता प्रदूषणमुक्त हाेणार आहे. पीएमपीकडून 25 इलेक्ट्रीक बसेसची खरेदी करण्यात आली असून नुकताच त्यांची चाचणी घेण्यात आली हाेती.

पुणे : पुणेकरांचा प्रवास आता प्रदुषणमुक्त हाेणार आहे. पीएमपीकडून 25 इलेक्ट्रीक बसेसची खरेदी करण्यात आली असून नुकताच त्यांची चाचणी घेण्यात आली हाेती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसेसचा लाेकार्पण साेहळा पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात या 25 बसेस पुण्यातील 3 मार्गांवर आणि पिंपरी चिंचवडच्या चार मार्गांवर धावणार आहेत. या बसेसमुळे प्रदुषण कमी हाेऊन पुणेकरांचा प्रवास प्रदूषणमुक्त हाेणार आहे. 

पीएमपीने 25 इलेक्ट्राॅनिक बसेस खरेदी केल्या आहेत. या बसेसची चाचणी काही महिन्यांपूर्वी घेण्यात आली हाेती. या चाचणीत या बसेस पास झाल्याने आता या बसेस नागरिकांच्या सेवेत दाखल हाेणार आहेत. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बसेसचा लाेकार्पण साेहळा पार पडणार आहे. या बसेस संपूर्ण इलेक्ट्राॅनिक असून यामुळे प्रदूषण राेखले जाणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात पाचशे ई-बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या टप्यात शहरात 25 बसेस धावणार आहेत. नव्याने येणाऱ्या ई-बसेस दोन्ही महापालिका हद्दीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांना ई-बसेसमधून प्रवास करता यावा, असे मार्ग ई-बसेससाठी निश्‍चित करण्यात आले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

या ई- बसेस चार्ज करण्यासाठी भेकराईनगर आणि निगडी डेपाे येथे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी या बसेस चार्ज करण्यात येणार आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर किती किलाेमीटर या बस धावतील याची माहिती मात्र मिळू शकली नाही.  

या मार्गावर धावणार ई-बस    पुणे शहर- भेकराईनगर ते पिंपळेगुरव (6 बसेस) - न.ता.वाडी ते भेकराईनगर (3 बसेस) - भेकराईनगर ते पुणे स्टेशन (3 बसेस) - हडपसर ते हिंजवडी (3 बसेस)

  पिंपरी- चिंचवड - डांगे चौक ते हिंजवडी चौक (6 बसेस) - मनपा भवन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन (2 बसेस) - भोसरी ते निगडी (2 बसेस)  

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणेNayana Gundeनयना गुंडे