शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

पुण्याचं हेरिटेज कचऱ्याच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 7:42 PM

जागतिक वारसा दिनानिमित्त शनिवारवाड्याच्या परिसराचा अाढावा घेतला असता, शनिवारवाड्याच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र अाहे.

पुणे  : जगभरात कुठेही पुणे शहराचं नाव घेतलं की डाेळ्यासमाेर येताे ताे पुण्यातील शनिवारवाडा. पुण्याच्या इतिहासात शनिवारवाड्याला अनन्य साधारण महत्त्व अाहे. परंतु पुण्याचं हे वैभव अाज कचऱ्याच्या विळख्यात अससल्याचे पाहायला मिळतंय. शनिवारवाड्याच्या बाहेरील बाजूस कचऱ्याचं सम्राज्य पसरलं असून प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे पुण्याचं हे वैभव कचऱ्याच्या विळख्यातून बाहेर काढून त्याचं पूर्वीच पावित्र्य जपलं जाणार का असा प्रश्न अाता उपस्थित केला जात अाहे.     18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन अर्थात हेरिटेज डे म्हणून जगभर साजरा केला जाताे. याच हेरिटेज डे च्या निमित्ताने लाेकमतने पुण्याचे हेरिटेज असलेल्या शनिवारवाड्याचा अाढावा घेतला असता, हा शनिवारवाडा कचऱ्याच्या विळख्यात असल्याचे समाेर अाले. शनिवारवाड्याच्या सर्वच बाजूंना कचऱ्याचे साम्राज्य पसरले अाहे. देश-विदेशातून पर्यटक शनिवारवाडा पाहण्यासाठी येत असतात. शनिवारवाड्याला एेतिहासिक वास्तूचा दर्जाही देण्यात अाला अाहे. या वाड्याच्या बाजूचा फूटपाथ हा पथारी व्यावसायिकांनी व्यापल्याचे चित्र अाहे. काहींनी तर वस्तू टांगूण ठेवण्यासाठी वाड्याच्या बुरुजाला खिळे मारले अाहेत. तसेच वाड्याच्या सभाेवताली अनेक भिकारी व मनाेरुग्ण बसलेले असतात. त्यांच्याकडून माेठ्याप्रमाणावर अस्वच्छता या भागात केली जात अाहे. शनिवारवाड्याच्या संपूर्ण परिघात ठिकठिकाणी कचरा साठलेला दिसून येताे. या कचऱ्यात गुटख्याची पाकिटे, चहाचे प्लॅस्टिकचे कप, शिळं अन्न, राडाराेडा पाहायला मिळताेय. येथील झाडांचा पालाही अनेक दिवसांपासून उचलण्यात अालेला नाही. या भागात असलेले मनाेरुग्ण त्याच ठिकाणी मलमूत्र विसर्जीत करत असल्याने शनिवारवाड्याच्या रस्त्याच्या बाजूने चालताना रुमाल नाकाला लावावा लगत असल्याची परिस्थिती निर्माण झाली अाहे.     शनिवारवाड्याच्या काही बुरुजांवर प्रेमी युगलांनी लेखन केले अाहे. काहीजन या बुरुजांना टेकूनच झाेपत असल्याने शनिवारवाड्याला वेगळेच स्वरुप प्राप्त झाले अाहे. पानमसाला, गुटखा खाऊन काेपऱ्यांमध्ये थुंकण्यात अालेले अाहे. काही समाजकंटक शनिवारवाड्याच्या बाहेरील बाजूच्या कुंपनाजवळच लघुशंका करीत असल्याने शनिवारवाड्याच्या एेतिहासिक महत्त्वालाच हरताळ फासला जात अाहे. त्यामुळे या सर्वांवर कारवाई हाेणार का असा प्रश्न अाता नागरिक विचारत अाहेत. 

टॅग्स :shanivar wadaशनिवारवाडाPuneपुणेBeggerभिकारी