शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

पुण्यातील पहिले ‘पेट पार्क’ बाणेरमध्ये; खेळ, शॉपिंग, दवाखाना, पेट टॉयलेटची खास सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 11:52 IST

स्मार्ट सिटीअतंर्गत पुण्यातील पहिले ‘पेट पार्क’ बाणेर येथे सुरू करण्यात येत आहे. पाळीव श्वानांसाठी फिरण्याची हक्काची जागा ही गरज झाली आणि त्यातून शहरामध्ये ‘पेट पार्क’ची संकल्पना अस्तित्वात येत आहे.

ठळक मुद्देपुरेसा व्यायाम व्हावा यासाठी पाळीव श्वानांना खेळण्यासाठी सर्वत्र उद्याने करण्याची मागणीरिकाम्या जागांचा उपयोग करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने प्लेस मेकिंग संकल्पना

सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : पुणेकरांची लाईफ स्टाईल बदलत असून, महागड्या श्वानांच्या प्रजाती पाळणारे हौशे पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर श्वानांची भीती, त्यांच्या भुंकण्याच्या आवाजाचा त्रास, खेळण्यासाठी लागणारी पुरेशी जागा अशा अनेक गोष्टींमुळे सार्वजिनक उद्यानांमध्ये श्वानांना फिरायला नेण्यासाठी बंदी असते. अगदी भल्या पहाटेपासून रस्त्यावरील भरधाव रहदारीतून फिरण्यासाठी श्वानांना साखळी लावणेही अपरिहार्य होते. श्वानांना मोकळेपणाने खेळता यावे, पुरेसा व्यायाम व्हावा यासाठी पाळीव श्वानांना खेळण्यासाठी सर्वत्र उद्याने करण्याची मागणी वाढत आहे. यामुळेच स्मार्ट सिटीअतंर्गत पुण्यातील पहिले ‘पेट पार्क’ बाणेर येथे सुरू करण्यात येत आहे.पुण्यातील हजारो कुटुंबांमध्ये परदेशी श्वान प्रजाती घरातील भाग होत आहेत. घरातल्याच सदस्याप्रमाणे श्वानांचाही विचार होऊ लागला. पोटच्या मुलाप्रमाणे या पाळीव कुत्र्यांसाठी रोजचे फिरणे, व्यायाम, खाणेपिणे करण्याचे खास वेळापत्रकच तयार केले जाते. परंतु मनुष्याप्रमाणेच उंच टॉवर्स, मोठे व प्रचंड रहदारीचे रस्ते, चकचकीत मॉल संस्कृतीमुळे या पाळीव प्राण्यांना देखील मोकळा श्वास घ्यायला जागा  शिल्लक नाही. तीन-चार खोल्यांच्या सदनिकेत हे पाळीव श्वानदेखील अडकून पडले आहेत. याचा श्वानांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळेच पाळीव श्वानांसाठी फिरण्याची हक्काची जागा ही गरज झाली आणि त्यातून शहरामध्ये ‘पेट पार्क’ची संकल्पना अस्तित्वात येत आहे.शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या मालकीच्या रिकाम्या जागा, भूखंड वापराविना पडून आहेत. तर अनेक ठिकाणी अतिक्रमणेदेखील झाली आहेत. या रिकाम्या जागांचा उपयोग करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने प्लेस मेकिंग ही  संकल्पना समोर आणली आहे. यात औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात स्थानिक क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत सामुदायिक शेती, सायन्स पार्क, बुकजानिया आणि आता किड्स आणि पेट पार्क उभारण्यात येणार आहे.

पोटच्या मुलांप्रमाणे या पाळीव कुत्र्यांसाठी रोजचे फिरणे, व्यायाम, खाणेपिणे इत्यादींचे खास वेळापत्रकच तयार केले जाते.पुण्यातील पहिले सार्वजनिक ‘पेट पार्क’ बाणेर येथे तयार करण्यात येणार आहे. या प्रशस्त अशा पेट पार्कमध्ये पाळीव कुत्र्यांसाठी मोठा जॉगिंग ट्रॅक,  खेळण्यासाठी विविध प्रकारची उपकरणे, पोहण्याचा तलाव, पेट क्लिनिक, पेट शॉपिंग सेंटर, पेट टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय पेटसोबत येणाऱ्या मालकांसाठीदेखील विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

टॅग्स :BanerबाणेरPuneपुणे