शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना मिळकत करात कचरा स्वच्छता करही द्यावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 17:15 IST

वाढीव पाणीपट्टीचा बोजा पडलेल्या पुणेकरांना आता कचरा स्वच्छता करही द्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला यातून वर्षाला सुमारे २२५ कोटी रूपये उत्पन्नाची अपेक्षा घरगुतीसाठी हा दर महिना १०० रूपये म्हणजे वार्षिक १२०० रूपये व्यावसायिक, औद्योगिक अशा प्रकारांसाठी वेगवेगळे दरपुणेकरांवर आधीच महापालिकेने वाढीव पाणीपट्टीचा बोजा टाकला दरवषी ५ टक्के याप्रमाणे पाणीपट्टीत येती १० वर्षे वाढ होत राहणार

पुणे :  समान पाणी योजनेसाठी लागू करण्यात आलेल्या वाढीव पाणीपट्टीचा बोजा पडलेल्या पुणेकरांना आता कचरा स्वच्छता करही द्यावा लागणार आहे. मिळकत करामधूनच या नव्या कराची वसुली होईल. केंद्र सरकारने सन २०१६ मध्ये केलेल्या स्वच्छता कायद्याचा आधार यासाठी घेण्यात आला आहे. वर्षाला सुमारे २२५ कोटी रूपये उत्पन्नाची अपेक्षा यातून प्रशासनाला आहे.घरगुतीसाठी हा दर महिना १०० रूपये म्हणजे वार्षिक १२०० रूपये आहे. १०० रूपयांपासून ते ५०० रूपयांपर्यंत मासिक असा दर मालमत्तेच्या वापरानुसार निश्चित करण्यात आला आहे. व्यावसायिक, औद्योगिक अशा प्रकारांसाठी वेगवेगळे दर आहेत. मालमत्तेच्या क्षेत्रफळानुसार जेवढा कर होतो त्यावर ही आकारणी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या दप्तरी एकूण ८ लाख ४२ हजार मिळकती आहेत. त्या सगळ्यांना हा कर लागू होईल. मिळकत करामध्येच तो लावला जाणार आहे. वर्षाला २२५ कोटी रूपयांचे उत्पन्न यापासून मिळेल असा प्रशासनाचा अंदाज आहे.पुणेकरांवर आधीच महापालिकेने वाढीव पाणीपट्टीचा बोजा टाकला आहे. ज्यासाठी ही वाढीव पाणीपट्टी लावण्यात आली आहे ती २४ तास पाणी योजना २ वर्षे झाली तरी अजूनही कागदावरच आहे. तरीही दरवषी ५ टक्के याप्रमाणे पाणीपट्टीत येती १० वर्षे वाढ होत राहणार आहे. त्याआधी अग्निशमन विभागाचा म्हणून एक नवाच कर मिळकत करात लावण्यात आला आहे. त्याशिवाय शिक्षणकर, वृक्ष कर व सफाई कर म्हणूनही एक कर घेतला जात असतो. हे सगळे कर एकत्रित लावून संकलीत कर म्हणून प्रत्येक मालमत्ताधारकाला बील पाठवले जाते. साध्या घरांसाठी साधारण ३ ते साडेतीन हजार रूपये असा वार्षिक कर द्यावा लागतो. त्यात आता या कचरा स्वच्छता कराची भर पडणार आहे. त्यमुळे कराची वार्षिक रक्कम एकदम वाढणार आहे.यापुर्वी महापालिकेचे कर्मचारी कुंडीमध्ये नागरिकांनी टाकलेला कचरा उचलून, वाहून नेत असत. त्यासाठी पैसे द्यावे लागत नव्हते. मात्र वाढत्या लोकसंख्येबरोबर कचराही वाढू लागला असून त्याची विल्हेवाट लावणे प्रशासनासाठी अडचणीचे ठरू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना हे काम करणे सोपे व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारने बरेच कायदे केले आहेत. युजर चार्जेस म्हणजे कचरा स्वच्छतेसाठी कर देणे या कायद्यानुसारच बंधनकारक करण्यात आले आहे. प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्यांनी तो पक्षनेत्यांच्या बैठकीत पाठवला. तिथे त्यावर बरीच चर्चा झाली मात्र निर्णय झाला नाही. आता १४ डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत हा विषय घेण्यात आला आहे. कर लागू करण्यास सभेने मंजूरी दिली की पुढील आर्थिक वर्षांपासून तो त्वरीत लागू होईल. प्रस्ताव केंद्र सरकारच्या कायद्याला धरूनच असल्यामुळे तो मंजूर करावा लागेल, दरात कमीजास्त करता येईल असा अंदाज एका अधिकाऱ्याने व्यक्त केला. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकर