शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पुणेकरांची १० दिवसांत होणार वाहतूक कोंडीतून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 20:49 IST

वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहरातील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि अन्य गोष्टींमुळे होणा-या वाहतूक कोंडी होणारे शंभर ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलीस, महापालिका एकत्र : शहरातील  शंभर ठिकाणावर धडक कारवाईस्वतंत्र दहा पथकांची नियुक्ती, तब्बल २५ क्रेन उपलब्ध

पुणे: पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहरातील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि अन्य गोष्टींमुळे होणा-या वाहतूक कोंडी होणारे शंभर ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी येत्या शुक्रवार पासून एकाच वेळी धडक कारवाई करून रस्ते मोकळे करण्यात येणार आहेत.     गेल्या काही वर्षांत शहरात वाढलेल्या वाहनाची प्रचंड संख्या आणि त्यात पथारी व्यावसायिक, अनधिकृत हातगाड्या, अनधिकृत व बेशिस्त पार्किंग यामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहेत. यामुळे होणा-या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचा श्वास गुदमरु लागला आहे. परंतु यावार आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळेच आयुक्त सौरभ राव यांनी पुढाकार घेऊन महापालिका आणि वाहतूक पोलीस, पोलीस यांनी एकत्र येऊन संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेताल आहे. यासाठी गेल्या एक-दीड महिन्यांपासून विविध बैठका घेण्यात आल्या. याबाबत आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, गेल्या एक महिन्यात पाहणी करून शहरात मोठी वाहतूक कोंडी होणारे तब्बल १०० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी महापालिका, वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांच्या संयुक्त विद्यामान कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र दहा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, कारवाई तब्बल २५ क्रेन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शुक्रवार पासून ही कारवाई सुरु होणार असून, येत्या दहा दिवसात पुणेकरांना मोकळा श्वास घेता येईल अशी अपेक्षा आहे.      शहरातली प्रामुख्याने मध्यवर्ती भागातील रस्ते, पेठामधील चौक तसेच वारंवार कोंडी होणा-या चौकाचा समावेश आहे. या ठिकाणी होणा-या अनधिकृत पार्किंग तसेच अतिक्रमणामुळे कोंडी होऊन सकाळी आणि सायंकाळी त्याचा परिणाम या कोंडीच्या ठिकाणांवर जोडणा-या रस्त्यांवर होतो. परिणामी शहरातील वाहतूकीचा वेग मंदावून जवळपास ४० ते ५० टक्के शहरात एकाच वेळी वाहतूक कोंडी होऊन त्याचा ताण सर्वच यंत्रणांवर येतो ही बाब लक्षात घेऊन ही संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. ----------------- वाहतूक कोंडीसाठी प्रथमच संयुक्त कारवाईशहरात होणा-या वाहतूक कोंडीचा पुणेकरांना मोठा फटका बसत आहे. परंतु वाहतूक कोंडी पोलिसांचा विषय, पोलिस महापालिका कारवाई करत नाही असे प्रकार सुरु होते. परंतु आता महापालिका, पोलीस आणि आरटीओ सर्व विभाग एकत्र येऊन संयुक्त काम करत आहेत.यात पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पुढील दोन दिवसात ही संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिका केवळ अतिक्रमणे काढते तर पोलीस वाहतूक सुरळीत करतात. परंतु ही कारवाई एकत्र होत नसल्याने त्यांचे परिणाम दिसत नाहीत.  ही बाब लक्षात घेऊन संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे पुढील काही दिवसात शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. -सौरभ राव, महापालिका आयुक्त 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSaurabh Raoसौरभ रावtraffic policeवाहतूक पोलीस