शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांची पोलिसांना एक से बढकर एक 'भन्नाट' उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 21:16 IST

घराबाहेर पडण्यासाठी देतात हास्यास्पद कारणे : कारणांचा तयार होईल नवा विश्वकोश

पुणे : मी ज्या दुकानातून दुध घेतले, त्या दुकानात दुध परत करायला चाललोय, रविवार असला तरी बँक चालू आहे, मला बँकेतून मेसेज आलाय, मी बँकेत पैसे भरायला चाललोय, मी कबुतरांना खायला घालायला जात आहे, लॉकडाऊनच्या काळात पुणेकरांनी घराबाहेर पडण्यासाठी पोलिसांना दिलेल्या कारणांपैकी ही काही कारणे आहेत. पुणेकरांची कल्पनाशक्ती आणि त्यांनी शोधलेल्या नवी नवी कारणाचा परिचय सध्या पोलिसांना येत आहे. पुणेरी पाट्या जगप्रसिद्ध आहेत, तशीच लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणार्‍या पुणेकरांनी दिलेली कारणे एकत्र केली तर एक नवा विश्वकोशही होऊ शकेल. 

कोणापुढे हार न मानणे, आपलेच म्हणणे खरे करण्याबाबत पुणेकरांचे असंख्य विनोद जगप्रसिद्ध आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्यात संचारबंदी सुरु आहे. विनाकारण फिरणार्‍यांना पोलीस अडवून चौकशी करतात. त्यावेळी अतिशय मजेशीर कारणे पुणेकर नागरिकांकडून दिली जात आहे. याबाबत पुणे पोलिसांनी नुकताच एक व्हिडिओ टिटवर टाकला आहे. 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दररोज जवळपास ५ हजार नवीन कोरोना बाधित आढळून येत आहे. असे असतानाही पुणेकर विनाकारण शहरात फिरताना आढळून येत आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अतिशय मजेशीर कारणे सांगितली जात आहेत.

https://twitter.com/CPPuneCity/status/1384833821946761218?s=1002

दूध आणायला चाललो आहे...

पोलिसांनी एकाला विचारले, तेव्हा त्याने दुध आणायला जात असल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी विचारले, तु राहतो कोठे आणि दुधासाठी जातोय कोठे, तुझ्या घराजवळ दुध मिळत नाही का, त्यावर त्याने उत्तर दिले की, मी ज्या दुकानातून दुध घेतले आहे, त्या ठिकाणी ते परत करण्यासाठी जात आहे. आता दुध परत करायला कोणी कधी जाताना पाहिले आहे का?

कबुतरांना खायला घालायलाएकाने पोलिसांना सांगितले की, मी कबुतरांना खायला घालायला जात आहे. आता त्याला आपल्या जिवापेक्षा प्राणीप्रेम महत्वाचे वाटतयं.

रविवारी बँकेत जायचयंएकाने पोलिसांना सांगितले की, मी बँकेत चाललोय. तेव्हा पोलिसांनी त्याला आठवण करुन दिली की आज रविवार आहे, बँका बंद असतात. तेव्हा त्याने आत्मविश्वासाने सांगितले की, बँक चालू आहे, आताच मेसेज आला, पैसे भरायला चाललोय. पुणेकर आपला जीव धोक्यात घालून विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे ही काही उदाहरणे. पुणे पोलिसांनी जनजागृतीसाठी आता सोशल मिडियाचा आधार घेतला असून विविध प्लॅटफॉर्मचा वापर त्यासाठी कल्पकतेने केला जात आहे.........पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. असे असताना पुणेकरांनी कारणे न सांगता घरात थांबावे. पोलीस आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची ही चेन ब्रेक करण्यास पोलिसांना सहकार्य करावे.अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या