शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकर आघाडीवर; एकाच महिन्यात ५६५ कोटींचा भरणा

By नितीन चौधरी | Updated: June 6, 2023 13:26 IST

दरमहा सरासरी १ लाख ५६ हजार ३३० वीज ग्राहकांची गेल्या ५ महिन्यांमध्ये वाढ झाली

पुणे: महावितरणच्यापुणे परिमंडलात मेमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह इतर २० लाख १५ हजार लघुदाब वीज ग्राहकांनी ५६४ कोटी ९९ लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’द्वारे भरणा केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांच्या सरासरीपेक्षा ही संख्या दीड लाखाने जास्त आहे. ऑनलाइन भरणा करण्यात पुणेकर राज्यात आघाडीवर आहेत.

पुणे परिमंडलामध्ये एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंत लघुदाब वर्गवारीतील सरासरी १७ लाख ४१ हजार ८६० वीज ग्राहक दरमहा ऑनलाइन वीजबिल भरणा करीत होते. ही संख्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ पर्यंत १८ लाख ६४ हजार ८२० वर गेली. त्यानंतर जानेवारी ते मे २०२३ पर्यंत सरासरी दरमहा ग्राहकांची संख्या २० लाख २१ हजार १३० वर गेली आहे. ऑनलाइन बिल भरण्यास पुणे परिमंडलामध्ये वीज ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि दरमहा सरासरी १ लाख ५६ हजार ३३० वीज ग्राहकांची गेल्या ५ महिन्यांमध्ये वाढ झाली आहे.

मेमध्ये पुणे शहरातील ११ लाख ३० हजार २२५ लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांनी ३१२ कोटी ८७ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे. यामध्ये महावितरणच्या बंडगार्डन विभागातील सर्वाधिक १ लाख ९१ हजार ९१३ ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगररोड, पद्मावती, पर्वती व रास्तापेठ विभागांमध्ये सरासरी १ लाख ५६ हजार ३८५ वीज ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे.पिंपरी चिंचवड शहरामध्ये लघुदाब ५ लाख २८ हजार ६४ ग्राहकांनी १४९ कोटी १० लाखांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे. पुणे परिमंडलामध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्यात पिंपरी चिंचवड शहर आघाडीवर आहे. गेल्या महिन्यात या शहराअंतर्गत पिंपरी विभागातील ३ लाख ८ हजार ११६, तर भोसरी विभागातील २ लाख १९ हजार ९४८ ग्राहकांनी ऑनलाइन भरणा केला आहे. पुणे ग्रामीणमध्ये गेल्या महिन्यात आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील ३ लाख ५६ हजार ९४५ ग्राहकांनी १०३ कोटी २ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणelectricityवीजMONEYपैसाSocialसामाजिक