पुणोरी ‘ट्रॅफिकॉप’ बासनात

By Admin | Updated: June 6, 2014 23:41 IST2014-06-06T23:41:43+5:302014-06-06T23:41:43+5:30

वाहनचालकाने तीन वेळा वाहतुकीचे नियम तोडल्यास त्याचे लायसन्स रद्द करण्याची कार्यवाही करण्याचा ‘ट्रॅफिकॉप’चा प्रयोग पुण्यात मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाला.

Punei Trafficop Basan | पुणोरी ‘ट्रॅफिकॉप’ बासनात

पुणोरी ‘ट्रॅफिकॉप’ बासनात

>पुणो : वाहनचालकाने तीन वेळा वाहतुकीचे नियम तोडल्यास त्याचे लायसन्स रद्द करण्याची कार्यवाही करण्याचा ‘ट्रॅफिकॉप’चा प्रयोग पुण्यात मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाला. केंद्र शासनाने या योजनेला उत्कृष्ट शासकीय पथदर्शी प्रकल्पाचा पुरस्कार देऊन गौरविलेही होत़े गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांनी ही योजना राज्यातील सर्व महानगरांमध्ये राबविण्यात येणार असल्याची घोषणाही केली होती़ तरीही त्यानंतर पुण्यासह संपूर्ण राज्यभर तिची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव 4 वर्षापासून राज्य शासनदरबारी 
पडून आहे. 
3 वेळा वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनचालकाचे लायसन्स रद्द करण्याचा कायदा करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. मात्र, 4 वर्षापूर्वीच वाहतूक विभागाचे तत्कालीन पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या पुढाकाराने ही योजना पुण्यात यशस्वी पद्धतीने राबविण्यात आली होती. 
‘ट्रॅफिकॉप’ योजनेअंतर्गत वाहतूक विभागातील अधिका:यांना ब्लॅकबेरी मोबाईल देण्यात आले होते. नियमभंग करणा:या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर मोबाईलद्वारे सव्र्हरकडे पाठविले जात. त्यानंतर मिनीटभरातच त्या वाहनाचा आरटीओकडे असलेला डाटा अधिका:यांना मिळत असे. त्यात वाहनाचा मेक, गाडीचा रंग, गाडीचा मालक व त्या वाहनाचा कर भरण्यात आला आहे का, याची माहिती मिळत अस़े वाहनचालकाने दिलेली माहिती व या योजनेतून आलेली माहिती, यांची पडताळणी मिनीटभरात करणो शक्य झाले होत़े यावरून वाहनचालकाच्या माहितीची खातरजमा होत असे. यातून अनेक चोरीची वाहने पकडण्यात वाहतूक शाखेच्या पोलिसांना यश आले होत़े  एखाद्या वाहनचालकाने तीनपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आल्यास त्याचे लायसन्स निलंबित करण्याची नोटीस त्याला जागेवरच दिली जात असे.
वारंवार नियमभंग करणा:या वाहनचालकांवर जरब बसण्यासाठी याचा फायदा होत होता. पोलीस ठाण्यांमधील बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध लावण्यात या तंत्रज्ञानाची खूप मदत झाली 
होती. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने हा प्रकल्प तयार केला आह़े त्यासाठीचा प्राथमिक सर्व खर्च या संस्थेने केला आह़े 
यामध्येच नियमभंग करणा:या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही होती़ त्यासाठी त्याला कायदेशीर मान्यता मिळणो आवश्यक होत़े तसा प्रस्ताव गृह विभागाने सादर केला होता़ राज्याच्या विधी व न्याय विभागाने त्यातील काही बाबींवर शंका उपस्थित केल्यावर त्यांचे समाधानही करण्यात आले होत़े त्यानंतर मात्र हा प्रस्ताव धूळ खात पडला तसाच आह़े (प्रतिनिधी)
 
च्वाहतूक विभागाकडून वाहनचालकाचे लायसन्स निलंबित करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविले जातात. त्यानुसार संबंधित वाहनचालकाचे म्हणणो ऐकून घेऊन त्याचे लायसन्स निलंबित केले जाते. 
च्गेल्या 3 वर्षात दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांची 5 हजार लायसन्स निलंबित करण्यात आली आहेत. दारू पिऊन वाहन चालविणो, रॅश ड्रायव्हिंग, मोबाईलवर बोलत वाहन चालविणो आदी नियमभंग केल्याप्रकरणी लायसन्स निलंबित करण्यात आली आहेत. लायसन्स निलंबित होण्यामध्ये रिक्षाचालकांची संख्या सर्वाधिक आहे. भाडे नाकारल्याप्रकरणीही त्यांचे लायसन्स निलंबित केले जातो.
 
दारू पिऊन वाहन चालविणो, रॅश ड्रायव्हिंग, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणो आदी नियम तोडणा:या वाहनचालकांच्या लायसन्स निलंबनाचे प्रस्ताव वाहतूक विभागाकडून आरटीओकडे पाठविले जातात, त्यानुसार लायसन्स निलंबनाची कारवाई केली जाते.   1 एप्रिल 2क्12 ते 31 मार्च 2क्13 या कालावधीमध्ये वाहतूक विभागाकडून लायसन्स निलंबनाचे 1,851 प्रस्ताव आले, त्यांपैकी 1,452 लायसन्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 1 एप्रिल 2क्13 ते 31 ऑक्टोबर 2क्13 या कालावधीमध्ये 1,122 प्रस्ताव आले, त्यांपैकी 821 लायसन्स निलंबित करण्यात आली.
- जितेंद्र पाटील
प्रादेशिक परिवहन अधिकारी 

Web Title: Punei Trafficop Basan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.