शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्रथमच पुणे ZPचा पुढाकार; एक हजारांपेक्षा जास्त पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 15:12 IST

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील बहुतेक सर्व गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना झाल्या आहेत. पण वीजबील थकले की महावितरण कंपनीकडुन वीज पुरवठा खंडीत केली जातो

पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे वीजबील थकले की महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडीत केला जातो व त्याचा फटका सार्वजनिक पाणी पुरवठ्यास व पर्यायाने ग्रामस्थांना बसतो असे चित्र सर्वत्र पहावयास मिळतो. यावरच उपाय म्हणूनच पुणे जिल्हा परिषेच्या वतीने जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 191 पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकाच वेळी ऐवढ्या मोठ्याप्रमाणात नळ पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील बहुतेक सर्व गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना झाल्या आहेत. पण वीजबील थकले की महावितरण कंपनीकडुन वीज पुरवठा खंडीत केली जातो. यामुळे नळ पाणी पुरवठा योजनेला पाणी असूनही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. तसेच अनेक वेळा पाणी पुरवठा योजनेसाठी अव्वाच्यासव्वा बील आकारणी झाल्याने पाणी पुरवठा योजना चालविणे ग्रामपंचायतींच्या आवाक्याबाहेर जाते. यामुळेच पुणे जिल्हा परिषदेने सर्व पाणी पुरवठा योजना टप्प्या-टप्प्यांनी सौर उर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 3 अश्वशक्ती, 5 अश्वशक्ती, 7.5 अश्वशक्ती आणि 10 अश्वशक्ती असलेल्या अर्व पंप सौर उर्जेवर चालवण्यात येणार आहेत. 

जिल्ह्यातील या नळ पाणी पुरवठा सौर उर्जेवर चालणार खेड 39, मावळ 15, बारामती 91, पुरंदर 135 , आंबेगाव 38, जुन्नर 116, शिरूर 96, इंदापूर 139, दौंड 162, मुळशी 66, वेल्हा 79, हवेली 101, भोर 114, एकूण : 1191

अखंडित पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी निर्णय जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अनेक पाणी पुरवठा योजना केवळ वीज बिल थकल्याने बंद पडल्या आहेत. अशा वेळी गावात नळ पाणी पुरवठा योजना असूनही माझ्या माता भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागते. यामुळेच जिल्ह्यातील तब्बल एक हजार पेक्षा अधिक पाणी पुरवठा योजना पहिल्या टप्प्यात सौर ऊर्जेवर चालवण्यात येणार आहे. शिल्लक सर्व योजना देखील भविष्यात सौर ऊर्जेवरच चालविण्याचे नियोजन केले आहे.- निर्मला पानसरे , जिल्हा परिषद अध्यक्षा

टॅग्स :PuneपुणेIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड