शिरूर :पुणेजिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी शनिवारी (दि. ७) झालेल्या निवडणुकांमध्ये ६८.३५ टक्के मतदान झाले होते. आज सोमवारी (दि. ९) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट होत आहे.मतमोजणीच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर येत आहेत. शिरूर तालुक्यात मात्र भाजपने दमदार कामगिरी करत ‘कमळ फुलवले’ असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसला आहे.शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका यंदा अत्यंत चुरशीच्या ठरल्या होत्या. तीन माजी आणि एका विद्यमान आमदारांच्या कुटुंबातील उमेदवार थेट रिंगणात उतरल्याने या निवडणुकांना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे या निवडणुका केवळ स्थानिक सत्तेपुरत्या मर्यादित न राहता प्रतिष्ठेच्या लढती बनल्या होत्या.परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या शिरूरमध्ये यंदा भाजपने आक्रमक रणनीती आखत जोरदार प्रचार केला. काही प्रमुख नेत्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आणि त्याचा थेट फायदा भाजपला झाल्याचे निकालातून दिसून येत आहे.टाकळी हाजी – कवठे यमाई गटातील निकालसमोर आलेल्या माहितीनुसार भाजपच्या उमेदवारांनी घवघवीत यश मिळवले आहे.टाकळी हाजी कवठे यमाई गट:राजेंद्र गावंडे (भाजप) – विजयीटाकळी हाजी गण:सुनीता कड (भाजप) – विजयीकवठे यमाई गण:कांचन सांडभोर (भाजप) – विजयी-----
शिरूर ग्रामीण - न्हावरे गटमालती पाचर्णे - (भाजप) विजयीशिरूर ग्रामीण गणस्वती घावटे (राष्ट्रवादी ) विजयीन्हावरे गणदीपक कोहकडे (राष्ट्रवादी ) विजयी---रांजणगाव गणपती - करेगाव गट स्वती पचुंदकर (भाजप) विजयीरांजणगाव गणपती गण सागर दरेकर (भाजप) विजयीकरेगाव गणमनीषा पाचंगे (भाजप)विजयीया निकालांमुळे शिरूर तालुक्यात भाजपचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढला असून येत्या काळात तालुक्याच्या राजकारणावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मतमोजणी अद्याप सुरू असून अंतिम निकालानंतर पुणे जिल्ह्यातील सत्तासमीकरण अधिक स्पष्ट होणार आहे.
Web Summary : BJP achieved significant gains in Pune ZP elections, especially in Shirur, traditionally an NCP stronghold. Early results show BJP winning key seats in Takali Haji and Shirur, signaling a potential shift in the region's political landscape.
Web Summary : पुणे ZP चुनावों में बीजेपी को बड़ी सफलता मिली, खासकर शिरूर में, जो पारंपरिक रूप से एनसीपी का गढ़ है। शुरुआती नतीजों में बीजेपी ने ताकली हाजी और शिरूर में अहम सीटें जीतीं, जो क्षेत्र के राजनीतिक परिदृश्य में संभावित बदलाव का संकेत है।