शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हा परिषदेचे विप्रो हाॅस्पिटल दोन दिवसांत शंभर टक्के क्षमतेने सुरू होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 21:40 IST

हिंजवडी येथील विप्रो कोविड हाॅस्पिटलची क्षमता तब्बल 439 बेड्सची असून, सध्या येथे 288 रुग्ण उपचार घेत आहे.

ठळक मुद्दे तातडीने 5 एमडी व 12 एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती 

पुणे : शहरासोबच ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत हिंजवडी येथील विप्रो कोविड हाॅस्पिटल येत्या दोन दिवसांत शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तातडीने  5 एमडी, 12 एमबीबीएस आणि तब्बल  63 बीएएमएस डॉक्टरांची सर्व पदे भरण्यात आली असून,  आरोग्य कर्मचारीदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हिंजवडी येथील विप्रो कोविड हाॅस्पिटलची क्षमता तब्बल 439 बेड्सची असून, सध्या येथे 288 रुग्ण उपचार घेत आहे. दोन दिवसांमध्ये नवीन स्टाफ रुजू झाल्यानंतर रुग्णालयामध्ये सर्व बेडवर रुग्णांवर उपचार सुरू केली जातील अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी सांगितले.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील  कोरोना रुग्णांसाठी जिल्हा परिषेदेने हिंजवडीमध्ये रुग्णालय सुरू केले. पहिल्या लाटेत अनेक रुग्णांनी याठिकाणी उपचार घेतले. रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था उपलब्ध असून, दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव लक्षात घेता त्याठिकाणी आवश्यक असलेले मनुष्यबळासाठी कंत्राटी स्वरूपात भरती केली जाणार आहे.

विप्रो रुग्णालयामध्ये सध्या एमडी डाॅक्टर पाच, एमबीबीएस बारा, बीएएमएस 63, नर्स 81 शिवाय आणखी पन्नासपेक्षा अधिक नर्सची भरती केली जाणार असल्याचे शेंडगे यांनी सांगितले. ------ 

ऑनलाइन कळणार बेड उपलब्धतेची माहिती ग्रामीण भागातील सरकारी आणि खासगी रुग्णालये तसेच कोविंड केअर सेंटर आणि कोविंड हॉस्पिटलमध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांची संख्या, उपलब्ध बेडची संख्या, तसेच साधे बेडबॅड, ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर यांची माहिती आता ऑनलाइन जनतेसाठी उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेने कोविंड  केअर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात ही यंत्रणा लोकांसाठी उपलब्ध होईल. नागरिकांना ऑनलाईन एका क्लिकवर बेड उपलब्धतेची माहिती मिळू शकेल. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली घुले यांनी ही माहिती दिली. विश्वगुरू इन्फो टीच चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गांगुर्डे यांनी जिल्हा परिषदेसाठी ही प्रणाली विकसित केली आहे.-----

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरzpजिल्हा परिषद