शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Pune Zilla Parishad : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा; १३पैकी १० पंचायत समित्यांवर सभापती पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:20 IST

- जुन्नरमध्ये शिंदेसेना, खेडमध्ये उद्धवसेना, तर दौंडमध्ये भाजपचा गड कायम

पुणे : जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुका सोमवारी (दि. ९) पार पडल्या. त्यामध्ये तब्बल १० पंचायत समित्यांच्या सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. जुन्नरमध्ये शिंदेसना, खेड उद्धवसेना, तर दौंड तालुक्यात भाजपने गड राखला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेबरोबरच पंचायत समित्यांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये अनुक्रमे जिल्हा परिषदेमध्ये ५१ जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता आणली आहे. १३पैकी ७ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामध्ये आंबेगाव, शिरुर, मावळ, हवेली, वेल्हे, बारामती, इंदापूर यांचा समावेश आहे, तर दौंडमध्ये भाजप, खेडमध्ये उद्धवसेचे सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय जुन्नर, पुरंदर, भोर आणि मुळशीमध्ये संमिश्र स्थिती असल्याने सत्ता कोणाची येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सभापती, उपसभापती निवडणुकीची घोषणा होताच अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही काहींनी भेट घेत आपला लेखाजोखा मांडला होता. चार तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना सत्ता आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.

सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये आंबेगाव, शिरूर, मावळ, बारामती, पुरंदर, इंदापूर, भोर, मुळशी, वेल्हा, हवेली या दहा पंचायत समित्यांचे सभापती, तर ८ तालुक्यातील उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. खेड तालुक्यामध्ये आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्त्वाखाली उद्धवसेनेने खेड तालुक्यात सर्वाधिक जागा मिळवत यश मिळवले होते. या ठिकाणी दोन्ही पदे ही उध्दवसेनेकडे आहेत. मुळशीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादीचे तीन सदस्य विजयी होऊन त्यांना काठावरचे बहुमत मिळाले होते. बहुमतासाठी त्यांना आणखी एका मताची आवश्यकता होती. शरद पवार गटाचे दोन सदस्य असून, भाजपचा एक सदस्य आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती निवडीच्या आदल्या दिवसांपर्यंत बहुमताचा जादुई आकडा मिळविण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीसह भाजपच्या गुप्त बैठकांचा सिलसिला सुरू होता. ईश्वर चिठीची वेळ आणण्यासाठी भाजपकडून विविध प्रकारे प्रयत्न करण्यात आले. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी आमदार शंकर मांडेकर यांनी केलेले प्रयत्न सफल झाले. भाजपला सत्तेपासून दूर करत सभापतीपदी अजित पवार गट, तर उपसभापतीपद शरद पवार गटाला दिले. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेना यांची आघाडी दिसून आली असून, उपसभापतीपदी शिवसेनेचे प्रवीण बाळासाहेब जगताप यांची निवड झाली आहे.

जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला ठेवले बाजूला

जुन्नर पंचायत समितीत शिंदेसेनेचे आठ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य, भाजप आणि उद्धवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला होता. राष्ट्रवादीने उद्धवसेनेला बरोबर घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या तर शिंदेसेनेला बहुमतासाठी एका सदस्याची आवश्यकता होती. भाजपचे संजय वराडी हे शिंदेसेनेला पाठिंबा देऊन उपसभापती बनतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नगरपरिषदेच्या निवडणुकीत खेडमध्ये शिंदेसेना-उद्धवसेनेमध्ये जश्या वाटाघाटी झाल्या. तोच फॉर्म्युला या ठिकाणी वापरण्यात आला. पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीत शिंदेसेना आणि उद्धवसेना एकत्र येत सत्ता स्थापन केली. यामध्ये सभापतीपदी शिंदेसेनेच्या कमल शेळकंदे यांची तर उद्धवसेनेचे अमित ढोले यांची उपसभापतीपदी निवड झाली. 

भोरला चिठ्ठीत राष्ट्रवादीचे नशिब

भोर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी चार सदस्य निवडूण आल्यामुळे सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत पेच निर्माण झाला होता. भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी फोडाफोडीचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर निवडणुकीत पीठासीन अधिकाऱ्यांनी चिठ्ठीद्वारे निवड करण्याचा निर्णय घेतला. सभापती आणि उपसभापती हे दोन्ही पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमदेवारांना नशिबाने साथ दिली. मनीषा कंक यांची सभापती आणि विशाल कोंडे यांची उपसभापती म्हणून निवड जाहीर करण्यात आली.

सात तालुक्यात महिला राज

जिल्ह्यातील १३ पैकी सात पंचायत समित्यांमध्ये महिला राज आले आहे. या समित्यांचा कारभार महिला चालवणार आहे. जुन्नर, शिरुर, खेड, मावळ, भोर, मुळशी आणि वेल्हे या सात तालुक्यात सभापतीपदी महिला आहेत. 

पंचायत समिती सभापती पदाचे पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस १०

शिंदेसेना १

उबाठा १

भाजप १

एकूण १३ 

पंचायत समिती उपसभापती पदाचे पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस ८

उद्धवसेना २

भाजप १

शिंदेसेना १

शरद पवार गट १

एकूण १३ 

English
हिंदी सारांश
Web Title : NCP Dominates Pune Panchayat Samitis, Secures 10 of 13 Chairmanships

Web Summary : NCP triumphs in Pune, securing 10 of 13 Panchayat Samiti chairmanships. Shinde Sena wins Junnar, Uddhav Sena claims Khed, and BJP holds Daund. Women lead in seven talukas.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६