शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हा परिषदेने रद्द केली निविदा क्लबिंगची पद्धत;मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 10:48 IST

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची माहिती; छोट्या कंत्राटदारांना आणि स्थानिक अभियंत्यांना दिलासा

पुणे :जिल्हा परिषदेनेजिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील कंत्राटी कामांसाठी क्लबिंग पद्धतीने निविदा काढण्याच्या प्रक्रियेवर पूर्णपणे बंदी घातली आहे. यापुढे जन सुविधा, ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्गाची कामे क्लबिंग न करता प्रचलित पद्धतीने निविदा काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, चालू वर्षात स्मार्ट स्कूल योजनेंतर्गत सुमारे २५० कोटी रुपये

आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ७६ कोटी रुपयांची कामे क्लबिंग करून निविदा काढण्यात आली होती. या निर्णयाला ठेकेदार संघटना आणि ठेकेदार महासंघाने तीव्र विरोध दर्शवला होता. याविरोधात ९ सप्टेंबर रोजी मोर्चाचे आयोजनही करण्यात आले होते. क्लबिंग पद्धतीमुळे काही ठेकेदारांनी निविदा मिळवून ती इतर ठेकेदारांना परस्पर वाटप केल्याचे प्रकारही समोर आले होते. या धोरणामुळे छोट्या कंत्राटदारांना,  सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना आणि मजूर सहकारी सोसायटींना कामे मिळणे बंद झाले होते.

यासंदर्भात अनेक निवेदने सादर झाली होती आणि प्रत्यक्ष बैठकादेखील आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी स्पष्ट केले की, यापुढे निविदा क्लबिंगची पद्धत बंद करण्यात येईल आणि सर्व कामांच्या निविदा प्रचलित पद्धतीने काढल्या जातील. हा निर्णय छोट्या कंत्राटदारांना आणि स्थानिक अभियंत्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. यामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे. दिव्यांग बोगस प्रमाणपत्र तपासणीचा दुसरा टप्पा सुरू

दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्र घेऊन बदलीचा फायदा घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची प्रमाणपत्रे तपासणीचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. त्यामध्ये ससून रुग्णालयाने दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी ससूनमध्येच करण्यात येईल. तर, इतर जणांची शासकीय वैद्यकीय रुग्णालयात करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडzpजिल्हा परिषद