शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही शॉर्ट्स आणि स्लीपर घातल्यात : आमच्या हॉटेलमध्ये नो एंट्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:58 IST

शॉर्ट पॅन्ट आणि पायात स्लीपर घातल्या आहेत असे सांगत रेस्टोरंटमध्ये प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यात घडली आहे. सेनापती बापट रस्त्यावरील एजंट जॅक रेस्टोरंटमध्ये काही तरुणांना तुमचा अपिअरन्स हा आमच्या हॉटेलमधील सेवा देण्यास योग्य नाही सांगत प्रवेश नाकारला आहे.

ठळक मुद्दे कपडे आणि चपलांवरून पुण्यातील हॉटेलमध्ये नाकारला प्रवेश एजंट जॅक हॉटेलमधील घटना : चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

पुणे : शॉर्ट पॅन्ट आणि पायात स्लीपर घातल्या आहेत असे सांगत रेस्टोरंटमध्ये प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यात घडली आहे. सेनापती बापट रस्त्यावरील एजंट जॅक रेस्टोरंटमध्ये काही तरुणांना तुमचा अपिअरन्स हा आमच्या हॉटेलमधील सेवा देण्यास योग्य नाही सांगत प्रवेश नाकारला आहे. याबाबत चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

         याबाबत घडलेली घटना अशी की, शहरातील आयसीसी टॉवरच्या बी विंगमध्ये संबंधित रेस्टोरंट आहे. त्याठिकाणी काल रात्री असीम त्रिभुवन, विराज मुनोत, डॉ अजित वाडेकर, संजय होस्मानी, डॉ प्रदीप शालिनी, विलास कोंढाळकर यांनी रात्री ११.३० वाजता प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यातील  काहींनी शॉर्ट पॅन्ट आणि स्लीपर घातली होती. या मुद्द्यावरून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. हॉटेलचे संचालक अझर यांच्याशी संवाद त्यांनी लॉबीतील नियम दाखवून त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला.त्यानंतर या तरुणांनी पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. पोलीस आल्यावरही रेस्टोरंट प्रशासनाची भूमिका कायम होती.

        तक्रारदार विलास कोंढाळकर यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की, रात्री आम्हाला उशीर झाला होता. त्यामुळे आम्ही संबंधित रेस्टोरंटचा पर्याय निवडला. पण त्यांनी ज्या कारणावरून प्रवेश देण्यास मनाई केले ते योग्य नाही. कुठे काय घालून जायचे हा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे आम्ही तक्रार नोंदवली आहे. दुसरे तक्रारदार विराज मुनोत म्हणाले की, आम्ही सर्वजण सुशिक्षित आहोत, पूर्ण बिल देणार होतो. तिथल्या वातावरणाला बाधा येईल असे कोणतेही वर्तन आमच्याकडून झाले नाही. मग अशावेळी फक्त कपडे आणि चप्पल बघून प्रवेश नाकारणे चुकीचे आहे. 

टॅग्स :PuneपुणेhotelहॉटेलPoliceपोलिसCrimeगुन्हा